• 748
  • 3 minutes read

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या भारतीय वेब विश्वात धमाकेदार प्रयोग होतांना दिसताहेत. एका बाजुला हिंदी इंडस्ट्रीतल्या मात्तब्बर निर्मात्यांच्या बिग बजेट फिल्म आणि सिरीज या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरताहेत. तर दुसऱ्या बाजूला नव्या दमाचे निर्माता – दिग्दर्शक सुद्धा छोटया बजेटमध्ये प्रयोगशील काम करतांना दिसतात. निव्वळ मनोरंजना पलीकडे या सगळ्या वेब सिरीज आणि फिल्ममध्ये प्रेक्षवर्गाला भुरळ पाडणारी गोष्ट म्हणजे, त्यांचे कल्पक विषय.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत. या जोडगोळीचा VIVID BOTTLE या वेब सिरीजमधील पाचवा एपिसोड “ओल्ड वाईन” MX PLAYER, TATA PLAY आणि HANGAMA या अग्रेसर OTT चॅनलवर प्रेक्षकांच्या बेहद पसंतीस उतरतांना दिसतोय.

खरंतर निओस्टार मल्टिमीडिया निर्मित Vivid Bottle या वेब सिरीजची संकल्पना ही त्याच्या शीर्षकाप्रमाणे विविध बॉटल्स भोवती घडताना दिसते. प्रत्येक एपिसोड हा बॉटलवर आधारित आहे. एक बॉटल माणसाचे आयुष्य कसे पालटते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही वेब सिरीज. कल्पकतेने वेगवेगळ्या बॉटल्स भोवती गुंफलेले कथानक अक्षरशः प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात.

काही दिवसांपूर्वी या सिरीजचा पाचवा एपिसोड “ओल्ड वाईन” वेबवर प्रचंड ट्रेण्ड होतांना दिसतोय. याचे मुख्य कारण म्हणजे परेश त्रिवेदी लिखित कथानक आणि त्याला चार चाँद लावणारे संतोष गणपत कांबळे यांचे दिग्दर्शन. वरवर पाहता खूप छोटा वाटणारा विषय छायाकार कीआन चव्हाण यांच्या अतुलनीय छायांकनाने प्रेक्षकांना कथेच्या गर्भित आशयात गुतवून ठेवतो. पाचव्या एपिसोडनंतर तर या वेब सिरीज बद्दल प्रेक्षकांचा अशा पल्लवित झाल्या आहेत यात तीळमात्र ही शंका नाही.

चुकवू नये असा हा, “ओल्ड वाईन” एपिसोड आपण पहिला नसेल तर आजच MX PLAYER, TATA PLAY आणि HANGAMA या अग्रेसर OTT चॅनलवर एकाच वेळी प्रदर्शित झालेला एपिसोड पाहून या प्रयोगशील कलाकृतीला बळकटी देणं हे सुजाण प्रेक्षकांचे आद्य कर्तव्य आहे..!

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *