• 198
  • 1 minute read

मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन हा व्यावसायिक कोर्स” सुरु करून मंदिर हा व्यवसायच असल्याचे केले सिद्ध

मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन हा व्यावसायिक कोर्स” सुरु करून मंदिर हा व्यवसायच असल्याचे केले सिद्ध

आजपर्यंत विद्यापीठांमधून शिक्षण हे व्यावसायीक कोर्सचे दिल्या जाते एवढं मला माहित होतं परंतु मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन कोर्स निर्माण करून मंदिरं हा सुद्धा व्यवसायच असल्याचे आज मलाच नव्हे तर संपूर्ण भारतीयांना कळलं.
तुमच्या मुलांचे मेंदू गुलाम करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे हे पहीलं पाऊल, विद्यापीठाचे नव्हे तर सनातन्यांचे हे पहिले पाऊल आहे. याचे कारण भारतातल्या सर्व विद्यापीठाचे ९०% कुलगुरु हे सनातनी ब्राम्हणवादी आहे, एवढी हिंमत होण्याचं कारण सरकारही सनातनी असल्याने वाटेल ते निर्णय ते घेऊ शकतात. यापुढे कदाचित संपूर्ण भारतभरातील विद्यापीठात हा कोर्स सुरु होईल.
बरं मंदिरालाच व्यवस्थापनाची गरज आहे का ? मज्जीद,चर्च, गुरुद्वारा, विहाराला व्यवस्थापनाची गरज नाही का? हिंदूंना गुरुद्वारा विहारात मज्जीद चर्च मध्ये जायची बंदी नाही, बिना कोर्सचं तिथलं व्यवस्थापन बघून,तिथला आदर्श हिंदूंनी घेतला तरी पुरेसे आहे. बरं मंदिराचा व्यवस्थापक कोण राहील? तर याच उत्तर ब्राह्मण पुरोहितच आणि झाडू मारायला तेली माली कुणबी मराठा … आज समाज जागृतीमुळे मंदिरात झाडू मारणारे मिळत नसल्याने हे पाऊल उचलले असावे की काय !.. एवढं मात्र नक्की,
         बेकरीची बिकट समस्या, शासकीय संस्थातील नोकऱ्या मिळणं दुरापास्त,आता एकच उपाय या अभ्यासक्रमाच्या नावानं या युवकांच्या हाती मंदिराची घंटा व झाडू द्यायचा व रोजगार दिल्याचा आव आणायचा, मुळात हा कोर्स कोणासाठी आहे? अर्थात विद्यापीठाचा कोर्स म्हटल्यावर सर्वांसाठी असेल, हा कोर्स करून एखाद्या sc st obc… ला पुजारी बनता येणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तीर्ण आहे. मंदिर व्यवस्थापन कोर्स मध्ये पुजारी बनण्यासाठी sc st obc यांना मंत्र तंत्र आरत्या पूजा कसी करायची हे शिकवणार काय? कोर्स पूर्ण केल्यास पुजारी म्हणून त्यांची नियुक्ती देईल का? मुलींसुद्धा हा कोर्स करू शकणार तेव्हा स्त्रियांना पुजारी बनवणार का? की गाभाऱ्याच्या बाहेर त्याच्या हाती घंटा आणि झाडूच असेल? बरं यासाठी कोर्स ची काही गरज नाही, बिना कोर्स ने बखुबी sc st obc घंटा वाजवत आहे,झाडझूड करत आहे, बिना कोर्स ने दान पेट्यातले पैसे मोजू शकते, दंडे घेऊन रांगा ही सांभाळू शकते., हे सगळं आजपवेतो होतच आहे की,आज भक्तीच्या नावाने अनेक बुजुर्ग बिना मोबदला मोठं मोठया मंदिरात सेवा देत आहे, त्यांची लंबी यादी झाडू मारायलाही वेटिंगवर असते. मग हा कोर्स कोणाच्या सुपीक डोक्यातला होय. यावर चिंतन केलं असता काही बाबी प्रखर्शाने जाणवते.

१) या कोर्स ला प्रामुख्याने पुरोहित वर्ग त्यांचीच
मुले पाठवणार.
२)त्यांची दानदक्षिणा व्यतिरिक्त पदवी असल्याने सरकारी पगाराची नोकरी तिथे पक्की होणार.
३) इतरांनी कोर्स केला तरी नोकरी देतांना निवडमंडळात ब्राह्मण पुरोहितच असणार तिथे आरत्या मंत्र तंत्र वेद गीता पुरानातले अध्याय विचारून त्यांना डावलणार.
४) इतरांनी जाण्याचा प्रयत्न केलाच तर त्यासाठी कॅट्यागिरी असणार गावोगांवी हिंडून मंदिर महात्म्य जनजागरण प्रसिद्धी व्यवस्थापन, मंदिर निर्माण व्यवस्थापन, मंदिर परिसर व्यवस्थापन,भक्त निवास व्यवस्थापन,सभामंडप व्यवस्थापन, सुशोभीकरण,स्वच्छता व्यवस्थापन,अर्थ व्यवस्थापन,मंदिर गाभारा व्यवस्थापन, पूजा व्यवस्थापन,… यापैकी त्याला कुठे नोकरी द्यायची हे ते ठरवणार.
५) sc st obc तथा महिलांना गाभाऱ्यात पूजा,अर्थ व्यवस्थापनात हा कोर्स करूनही नोकरी मिळणार नाही. यांच्याकडे वर्गणी गोळा करून मंदिर निर्माण व्यवस्थापन सोपविल्या जाईल, सरकारी नोकरी व मंदिरं बांधायच्या दिलेल्या टार्गेटचं दडपण त्यामुळे तुम्ही मंदिर उभारणीच जिकरीने काम करणार व त्यांच्या धंद्याला व्यवसायाला भरभराटी आणणार, गाडगेबाबानी सांगून कळलं नाही परंतु विद्यापीठाने सुरु केलेल्या या कोर्समुळे तरी तुम्हाला नक्की कळलं असेल की मंदिरं हा भटांचा व्यवसाय आहे,धंदा आहे. या व्यवसायात तुमच्या हाती मात्र झाडू आणि घंटाच एवढं मात्र नक्की…
बहुजनांनो जागे व्हा अन्यथा बसा घंटा वाजवत…

 ✒️ रामचंद्र सालेकर (राज्य उपाध्यक्ष )
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *