मनुस्मृती राबवण्याचा ज्यांचा अजेंडा आहे त्यांच्या मनात आव्हाड यांच्या मनुस्मृती दहनाचा राग असल्यानं ते अस्वस्थ झाले … त्याना आव्हाडांच्या कृतीनं आयती संधी मिळाली … आंबेडकर अनुयायांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते आव्हाडांवर टीका करतील , आंदोलनंही करतील …जर त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप आदर असेल तर प्रथम त्यांच्या शासनाने घेतलेला निर्माण रद्द करण्यास सांगावे … तो निर्णय रद्द झाला की आव्हाडांचा निषेध करावा … बाबासाहेबांना पुतळ्यात , प्रतिमेत शोधणाऱ्यानी मनुस्मृती राबवणाऱ्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आपण काय केलं ? याचा विचार करावा … कालपर्यंत ज्या बाबासाहेब प्रेमींनी समाज माध्यम नि इतरत्र निषेधाचा #नि सुद्धा उच्चारला नाही ते मनुस्मृती समर्थांकांना बळ देणाऱ्या प्रतिक्रीया देत आहेत … महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात मनुस्मृती डोक्यात ,मनात असणाऱ्या ,ती राबवणाऱ्यांना बाबासाहेबांनी लाथाडले होते …जे मनुस्मृतीला नाकारून आमच्या भूमिकेचे समर्थन करतील अशा ब्राम्हण , सीकेपी आणि सर्व उच्च वर्णीय सहकार्यांना सोबत घेऊन बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती …आज स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे मनुस्मृतीच्या समर्थकांची भाषा बोलत आहेत … आपल्याला कृतीने कुणाला बळ तर मिळणार नाही ना ? याची जाणीवही त्यांच्या गावी नाही … आज बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून गळे काढणाऱ्यानी बाबासाहेबांना मूर्तीत नि फोटोत बंदिस्त केले … त्यांना बाबासाहेबांच्या विचारांना , त्यांच्या अनुयायांना विरोध आहे … दलित ,आदिवासी , ओबीसी नि भटके विमुक्त यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना विरोध आहे … या घटकांचा विकासाचा केवळ दिखावा करणाऱ्या नि या घटकांचा प्रगतीच्या आड येणाऱ्या सर्व मनुवाद्यांचा ते सर्वच धर्मात ,समाजात , राजकीय पक्षात आहेत … आंबेडकरवादी भावनिक प्रश्नाला बळी पडतात म्हणून आशा विषयांना खतपाणी घालणाऱ्यांचा हेतू तपासून पहिला पाहिजे … आंबेडकरवाद्यांच्या प्रगतीचा विचार न करता त्यांना भावनिक करून आपले राजकारण कोण कोण करतं तेही आता वोळखता आलं पाहिजे … दलित पुढाऱ्यांनीही आपल्या समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जावे हे ठरवावे … वंचितांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवर #ब्रही न काढणाऱ्या पण भावनिक विषय पेटवणाऱ्या पुढाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे … आव्हाड चुकले किंवा त्यांच्या कडून अनावधानाने चूक झाली की मुद्दाम त्यांच्या हाती बाबासाहेबांचा फोटो असलेले पोष्टर दिले , असे काहीही झालेले असू शकते … आव्हाडांनी ते फाडण्यापूर्वी तपासून घेतले पाहिजे होते … सर्वत्र विवेक शून्य व्यहार होतं असताना आव्हाड मनुस्मृती समर्थकांच्या विरोधाला न जुमानता प्रतिकात्मक का होईना पण आंदोलन केलं … त्यांत स्टंटबाजी आहे असे म्हणावे तर आपण काय करतोय हेही आंबेडकरवाद्यांनी तपासून घ्यावे … वंचितांच्या समस्या वाढवणाऱ्यांना बळ मिळेल अशा कृती आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे … आपला वापर तर होत नाही ना याचीही दक्षता घेतली पाहिजे … राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश केला जाणार नाही असा खुलासा आज केली पण हा खुलासा वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर केला असता तर आव्हाडांना मनुस्मृती दहन कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली नसती … मनात आहे पण आता विरोध होतोय म्हणून तर हा खुलासा आला नाही ना ? … नाही तरी 400 पार नंतर संविधान बाजूला करून मनुस्मृती लागू करू असा नारा दिलाच आहे … – यशवंत भंडारे.