अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतिकार्थी दहन करताना चुकून या पोस्टवर बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला. आव्हाडांनी अनावधानाने झालेल्या या कृतीची माफी जाहीर माफी मागितली आहेच. ती आंबेडकरवादी म्हणून आपल्यासाठी पुरेशी आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा एकूण प्रवास आणि वैचारिक स्पष्टता लक्षात घेता भाजपाने कांगावा करून आव्हाडांची जी सार्वजनिक लिंचींग चालवलेली आहे त्यात आंबेडकरवादी म्हणून आपण सामिल होता कामा नये.
आव्हाडांचा निषेध करायला भाजपाचे सर्व नेते हौशेने उतरलेत ते का उतरलेत? हे आंबेडकरवादी जनतेने समजून घ्यावे. भाजपाईंची आंबेडकर आणि राज्यघटनेबाबत कसलीही प्रतिबद्धता नाही हे आपण सर्वजण चांगलेच जाणतो.
जितेंद्र आव्हाड यांचा अभिमन्यू करायचा भाजपाचा प्लान आपण उधळून लावायला हवा.
अजूनही भाजपाई अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याविरोधात चक्कार शब्द बोलत नाहीत. ते फक्त उसनं आंबेडकरप्रेम आणून आव्हाडांची नियोजनबद्ध लिंचींग सुरूय. आपल्याइतकी वैचारिक स्पष्टता आणि राजकीय शहाणपण असणारा समुह दुसरा नाही. तेव्हा जरा थंड घ्या! आव्हाडांचा मनुस्मृतीविरोधाचा हेतू लक्षात घ्या. आणि चुकून घडलेल्या कृतीकडे दुर्लक्ष करा.