पुण्यात जे काय घडल त्याची विस्तृत चर्चा माध्यमावर झाली आहे . मराठी माध्यमानी जागरूक राहून हा मुद्दा रविन्द्र धंगेकर यांनी आंदोलन केल्या नंतर मसालेदार रित्या चघळला सुद्धा . मित्र हो यात मला एक बाब लक्षात आली की , बिल्डर लॉबी विक्रमी नफा कश्या कमावतात ? पुण्यात सुमारे ९०% इमारती ह्या आर झोन मधे आहेत . ह्या जागा बिगरशेती ही नसतात . गेल्या १० वर्षात एक ठराविक कम्युनिटी ह्या व्यवसायात आली . राजकारणी लोकांचे २ नंबर चे पैसे बिल्डर लाईन मधे कसे येतात याच्या अनेक मनोरंजक बाबी आहेत . जागेसह १२ लाख रुपये सरासरी बांधकाम येणारा फ्लॅट हा ७० लाखाला विकला जातो . सरासरी १५ लाख खर्च गृहीत धरला तर सुमारे ५० ते ६० लाख रुपये एका फ्लॅट मधे मिळतात . पुण्यात मागील ५ वर्षात प्रचंड फ्लॅट मोकळे पडून होते , ग्राहक नव्हता , पण काही ऑफर देऊन बिल्डर लॉबी ने ते विकले . बऱ्याच बिल्डिंग ह्या बिगर शेती नाहीत . खरेदी होते . कशी होते , बिल्डर यांनी खरेदी विक्री रजिस्टर अधिकारी खिश्यात बसवला आहे . कोणताही रजिस्टर अधिकारी घ्या , त्याची संपत्ती अब्जात असेल . कृत्रिम रित्या फ्लॅट च्या किमती वाढवून प्रचंड नफेखोरी अलिकडील १० वर्षात आली आहे , याला ठराविक राजकीय पक्ष जबाबदार आहेत . गणपत गायकवाड यांचा गोळीबार याची साक्ष आहे . राज्यात आज शहरात जमिनीचे युद्ध रोजच होत आहे . यातून काही टोळ्या निर्माण झाल्यात . त्या टोळ्या उद्याच्या दृष्टीने वाईट आहे हे नक्की . अमाप पैसा असेललं अग्रवाल राक्षस याचे ज्वलंत उदाहरण आहे . १७ वर्षाचे बाळ दूध ऐवजी दारू पिते . पब मधे एका तासात ४८ हजार रुपये बिल करते . बिना नोंदणीची गाडी रस्त्यावर खुले आम ३ महिने फिरते . बाप सांगतो पब मधे जा , दारू पी , चंगळवाद कर! किती हीन विचारचे हे कुटुंब असेल . वास्तविक ह्या कुटुंबाचे बरेच सत्य पुढे येईल . ते तपासले पाहिजे . पैशाने आम्ही पोलीस, न्याय विकत घेऊ शकतो , मग किती ही मूडदे पाडा. पोलीस पब मधून कसे हप्ते वसूल करतात याचे धंगेकर यांनी व्हिडिओच प्रसारित केले आहे . पुणे पोलीस कसे आहेत , पोलिसांचे वसुली नेटवर्क कसे आहे याची पोलखोल त्यांनी केली . ह्या संस्कारहीन कुटुंबांना पोलीस अन् न्याय व्यवस्था बळ देत असेल तर काय म्हणावे ! ही सर्व माजलेली भूत आहेत अन् आज ते आपल्या मांगुतीवर बसलेली आहेत . राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे . पैसा सर्वश्रेष्ठ ठरत आहे . पैशाची ही भुते काही करा ती आपल्या बोकांडी कायमची बसली आहेत , उतरणार नाहीच . संस्कार नसलेलं बापच जन्म घेत असतील तर त्या घरातील ही बाळ कशी निपजतील . समाजाने विचार केला पाहिजे . समाज विचार करणार नाही कारण ह्या एकतरी भूताशी समाजघटकांचा संबंध येत असतो .. चला आपण फक्त मरण पाहत बसायचे , दोन दिवस धाय मोकळून रडायचे , राक्षसानी पोटचा गोळा मारला म्हणून श्रधांजली अर्पित करायची , मग ते प्रवरेत वाळु तस्कर यांच्या खड्यात मरो , नाही तर दारुड्या बाळाच्या कार ने मरो… लोणी खात बसणारे राजकारणी , सत्ताधारी , अधिकारी यांना काय करायचे , शेवटी तुम्हाला अन् मला वाळूच्या खड्यात किवा दारुड्याच्या गाडी खालीच मरायचे आहे… ज्ञानेश्वर गायकर पाटील संगमनेर