• 36
  • 1 minute read

माझे मत:!!!

माझे मत:!!!

18 व्या लोकसभा निवडणुकीत NDA ला 300 चे वर जाता आले नाही. संविधान बदलण्यासाठी 400 पार ची घोषणा भाजपा वर उलटली. संविधानाचा अनादर करणारे व लोकशाहीला कमजोर करणारे जे कोणी पक्ष v नेते असतील ,त्यांना मतदार साथ देत नाही हे या निकालाने दाखवून दिले. या निवडणुकीत ,भाजपा कडे प्रचंड साधन सामुग्री, पैसा , सत्ता , यंत्रणेवर प्रभाव ,मीडिया, आणि सगळं काही होतं. सत्तेत असल्यामुळे यंत्रणेचा सोयीने वापर – गैरवापर करण्याची सोय होती. विरोधी पक्षांकडे यापैकी काही ही नव्हते. निवडणुकीसाठी Level playing fields समान असावी लागते ती INDIA गठबंधन- विरोधी पक्षांकडे नव्हती.त्याचा फटका विरोधकांना बसला. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न जरी यशस्वी झाला नाही तरीपण 18व्या लोकसभेत काँग्रेस व INDIA तुल्यबळ व प्रभावी विरोधी पक्ष असणार आहे.

2. असो, नेत्यांनी जनतेच्या मतांचा आदर केला पाहिजे. गृहीत धरू नये , मतदार जेव्हा विवेक वापरतात व संविधानाला महत्व देऊन मतदान करतात तेव्हा, चित्र वेगळे असते. मतदारांची दिशाभूल करू नये, भूलथापा देऊ नये. नेत्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावे व संविधानिक मूल्यांचा आदर करून त्यानुसार वर्तन करावे. माणसाने माणूस राहावे व माणुसकीला शोभेल असे वागावे. सत्ता कोणाकडे ही कायमची राहत नाही. आपले संविधान लोकांचे आहे, लोकांसाठी आहे. देवलोकांसाठी नाही. म्हणून संविधान प्रस्ताविका, आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरू होते. लोक सार्वभौम आहेत, ठरवतात. येथे देवाचे काही काम नाही.

3. लोकसभेत भाजपा चे स्वतःचे बहुमत नाही. इतरांच्या मदतीने काहीही करून सरकार स्थापन केले तरी मर्जीचा कारभार करता येणार नाही.18 व्या लोकसभेत तानाशाही संपेल आणि लोकशाही चा कारभार सुरू होईल, नवीन संसदेत नवीन पर्व -सामाजिक न्यायाचे सुरू होईल. INDIA गटबंधन आज जसे आहे तसे भविष्यात ही एकत्र ,एकजूट व मजबूत राहिले तर केंद्रात सत्ता स्थापन करण्यास संधी आहे.

4. 2019 च्या 17 व्या लोकसभा निवडणूक निकालाच्या तुलनेत काँग्रेस व साथी पक्षाचे यश खूप मोठे आहे. राहुल गांधी ची भारत जोडो यात्रा,व न्याय यात्रा मुळे जनमानसात काँग्रेस व मित्र पक्षाची विश्वासहर्ता वाढली. संविधानाने साथ दिली ,लोकांनी मत दिले म्हणून आज एवढे यश मिळाले. हे खरे यश आहे, बहुमत नसले तरी. संविधान आणि लोकशाही वर विश्वास असणाऱ्या नी NDA ममधून बाहेर पडावे व INDIA आघाडीत यावे . कारण, संविधान त्यांचे भविष्य उज्वल करेल आणि लोक कल्याणाचे / सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरू होईल. Modi यांचे गॅरंटी वर Rahul gandhi यांची गॅरंटी प्रभावी ठरली. तेव्हा, 5 न्याय पत्र व 25 गॅरंटी मिळवून देणेसाठी काम करावे लागेल. तसेच संविधान व लोकशाही साठी प्रचार काळात जसे संविधानाचे महत्व सांगण्यात आले आहे, संविधान हातात घेऊन , त्याहून अधिक वेगाने संविधानाचा प्रचार झाला पाहिजे.

5. हे संविधानाचे 75 वे वर्ष आहे, संविधान का अमृत महोत्सव , घर घर संविधान हा उपक्रम ,जे सरकार स्थापन करतील त्यांनी व जे विरोधात असतील त्यांनी ,सर्व राजकीय पक्षांनी , देशभर सुरू करावा. देशाचे संविधान आहे. आम्ही , संविधान फौंडेशन चे वतीने सत्ताधारी v विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे ऑक्टोबर 2022 पासून मागणी करीत आहोत. पाठपुरावा- पत्रव्यवहार सुरूच आहे. बघू या, या विषयी नवीन सरकार काय निर्णय घेते !

6. विजयी झालेल्या सर्व लोकसभा सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

इ झेड खोब्रागडे , भाप्रसे नि
संविधान फौंडेशन ,नागपूर

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *