• 71
  • 1 minute read

लोकसभा निवडणूक निकालावर एक नजर…!

लोकसभा निवडणूक निकालावर एक नजर…!

आंबेडकरी जनता संघ, भाजपच्या विरोधात, तर नेते मात्र भाजपसाठी लाभकारी…!

          मनुवादी व्यवस्थेचा चेहरा फार भयानक असून त्यास समजने, समजून घेणे ही तितकेच कठीण आहे. अन् याचाच फायदा मनुवादी शक्ती घेत आहेत. कोण आहे ही मनुवादी शक्ती, तर तिचे आजचे नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आपण सर्वच जन माणूस म्हणून जन्माला आलो असल्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ही निश्चितपणे आपल्या सर्वांना आहेच. पण इथे तसे नाही. मनुवादी व्यवस्था निर्माण करणाऱ्या शक्तींनी माणूस म्हणून जन्मास आलेल्यांमध्ये भेदभाव निर्माण करून माणसाला माणसाचा गुलाम, दास बनविले आहे. अन् त्या व्यवस्थेचे नाव आहे मनुवादी व्यवस्था. त्यामुळे ही व्यवस्था गाडल्या शिवाय माणसाला माणूस म्हणून जगताच येणार नाही, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजले. अन् त्यांनी माणसाला गुलाम करणारी मनुची संहिताच जाळून टाकली. पण मनुवादी ही हुशार निघाले, त्यांनी मनुस्मृती जाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच चळवळीत मनुस्मृतीचे गुलाम तयार केले. अन मग त्यांनी नारे दिले ” हाथी नहीं गणेश है, ब्रह्म, विष्णू, महेश है,” ही घोषणा आंबेडकरी मिशनच्या नावाखाली दिली गेली. इतकी विडंबना आंबेडकरी विचार अन् चळवळीची कोणी ही केली नाही. जितकी ती आंबेडकरवाद्यांनीच केली. कांशीराम व मायावतीने याचे नेतृत्व केले. थोड्या कमी अधिक फरकाने रामदास अन् प्रकाश आंबेडकर ही हेच करतात. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सारा देश संघ, भाजपच्या संविधान विरोधी भूमिकेच्या विरोधात लढत असताना हे नेते अन् त्यांच्या सारखेच काही लिंबू टींबू भाजपच्या संविधान विरोधी भूमिकेचा विजय झाला पाहिजे, यासाठी निवडणुकीच्या मैदानात लढताना आपण पाहिले. अतिशय क्लेशदायक हे चित्र आहे.
        राज्यमंत्रीपद दिले नाहीतरी आम्ही आपल्या वळचणीला आहोत, आमची आडोशाची जागा तरी कायम राहु द्या, अशी याचना आता रामदास आठवलेंनी मोदींकडे केली आहे. तर कांशीराम यांच्या तालमीत तयार झालेल्या मायावतींचे अन् संघाचे संबंधच इतके घट्ट आहेत की, त्यांना याचना करायची ही गरज पडत नाहीं. संघ, भाजप अन् बसपामधील आपापसातील संबंध इतके घट्ट कांशीरामने बनविले आहेत की, संघ, भाजपसाठी हे संबंध नेहमीच हनुमानाची भूमिका बजावत आले आहेत. आता राम अन् रावणाच्या संघर्षात माकडांची भूमिका काय होती ? याचा अभ्यास इथल्या तमाम आंबेडकरवादी विचारांच्या चळवळीने केला पाहिजे. मगच माकडांच्या भूमिकेतील बसपा आपल्याला स्पष्ट दिसेल. राम – रावण यांच्यातील युध्दात माकडांना काय मिळाले ? त्यांचे काय झाले ? याचा काहीच इतिहास सापडत नाही. पण रावणाचा पराभव झाल्यावर बिभिसेन लंकेचा राजा, तर राम अयोध्येचा राजा झाला. अन् माकडांचा चॅप्टर क्लोज झाला. तसेच काहीसे मायावती, प्रकाश आंबेडकर व रामदास आठवलेंचे झाले आहे.
         मोदी हे संविधान व लोकशाही विरोधी आहेत. हे साऱ्या जगाला वाटले. लोकशाही विरोधी म्हणून त्यांना जगभराने ट्रोल ही केले. संविधानाच्या मुद्द्यावर झालेल्या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी भाजपच्या विरोधात मतं देवून मोदीला संविधान विरोधी ठरविले. पण मायावती, प्रकाश आंबेडकर व आठवलेंनाच फक्त तसे वाटले नाही. हे फार गंभीर आहे. १८ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अगदी मोदींच्या सोयीनुसार जाहीर झाला. तोपर्यंत संविधान हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा नव्हता. निवडणुका जाहीर होताच इंडिया आघाडीतील घटक पक्ष व एनडीएतील घटक पक्ष आपला जाहीरनामा, वचननामा बनवायला लागले. तोपर्यंत ही संविधान मुख्य मुद्दा नव्हता. पण प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होताच जनतेच्या रेट्याने हा मुद्दा प्रचारात आला व सर्व जाहीरनामे, वचननामे छु मंतर होऊन संविधान मुख्य मुद्दा बनला. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, भाजप, मोदींला रोखण्याचा खरा फॉर्म्युला जनतेनेच इंडिया आघाडीला दिला व तो यशस्वी ही झाला. बाकी या निवडणुकीत संविधान वाचविणे हा प्रमुख मुद्दा नसता तर निवडणुकीचे निकाल आजच्या पेक्षा वेगळे लागले असते. हे मात्र नक्कीच.
        भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याची राजकीय व्यासपीठावरुन खिल्ली उडविली जात असतानाच्या काळातच संविधान बदलण्यासाठी भाजपला ४०० जागा हव्या आहेत, असा प्रचार सोशल मिडियावरून खूप मोठ्या प्रमाणात सूरू झाला. त्याची दखल राजकीय पक्षांनी अन् प्रत्यक्षात उमेदवारांनी ही घेतली. हा मुद्दा भाजपला बहुमताच्या आकड्यापर्यंत ही पोहचू देणार नाही, याची चाहूल ही भाजपला दुसऱ्या टप्प्यापर्यंत लागली नाही. पण जेव्हा लागली, तेव्हा फारच उशीर झाला होता. आम्ही पुन्हा सत्तेवर आलो तरी संविधान बदलणार नाही, असे आश्वासन जनतेला देतानाच भाजपने संघापासून स्वतःला वेगळे करण्याचा प्रयत्न ही निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात भाजपच्या विरोधात देशातील जनता असेच चित्र दिसत होते व जनतेचे प्रतिनिधीत्व इंडिया आघाडी करीत होती. त्यामुळेच ही लढाई इंडिया आघाडीसाठी सोपी झाली. अन् भाजपसाठी कठीण…!
        १८ व्या लोकसभा निवडणुकीतील निकालावरून नजर टाकली तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या हे खरे असले तरी केवळ २००० मतांनी भाजपने १६५ जागा जिंकल्या आहेत. तर १००० मतांनी ७९ जागा जिंकल्या आहेत, ५०० च्या आत २३, तर केवळ २०० मतांनी ७ जागा जिंकल्या आहेत. भाजपला मिळालेल्या २३९ जागांमधून १६५ जागा वजा केल्या तर भाजपला केवळ ७४ जागा मिळाल्या आहेत. अन् या मिळविताना ही निवडणूक आयोग, EVM मशीन अन् शासकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या गैरवापर केला आहे. त्याशिवाय या ७४ जागांपैकी किमान अर्ध्या जागा भाजपने उभ्या केलेल्या बी टीममुळे मिळाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर, मायावती व ओवेशींने या बी टीमची भूमिका पार पाडून भाजपला मदत केली. हे उघड  सत्य आहे.
         तर या निवडणूकीत संविधान व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने देशाच्या अस्मिता ठरल्या. राष्ट्र, संविधान व लोकशाहीच्या प्रति जनतेचा असलेल्या निष्ठा, आदरभाव पहिल्यांदाच समोर आला. धर्म अन् धर्मांची देवळ संविधानासमोर किती किरकोळ आहेत, हे ही दिसले.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *