दीक्षाभूमीला उध्वस्त होण्यापासून वाचवा.गेल्या काही महीन्यापासून सौंदर्यीकरणाच्या नावाने दीक्षाभूमीला उध्वस्त करण्याचे मोठे कारस्थान राबविण्यात येत आहे.करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग करण्यात येत आहे. जागतिक वारसा असलेल्या या राष्ट्रीय स्मारकाला लागूनच अत्यंत खोलवर खोदकाम केलेले आहे.त्यामुळे या भव्य स्मारकाला धोका पोहचून ते केव्हाही क्षतिग्रस्त किंवा दुर्घटनाग्रस्त होवू शकते.मुळात या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगची आवश्यकताच नाही. भारतात कोणत्याही धार्मिक स्थळाखाली अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही मग दीक्षाभूमीवरच अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी ?
👉 बोधी वृक्षाला धोका श्रीलंकेहून आणलेल्या बोधीवृक्षाची मूळे या खोदकामा दरम्यान क्षती ग्रस्त होऊन भविष्यात हा बोधीवृक्ष नष्ट व्हावा यासाठीचे हे कूटील कारस्थान आहे हे अनुयायांनी लक्षात घ्यावे
👉 पुस्तक विक्री आणि अनुयायांना येण्यास थांबवणे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी भारतभरातून, विदेशातून बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने दीक्षाभूमी वर येतात आणि बाबासाहेबांच्या साहित्याची येथून विक्रमी खरेदी करून जातात.ज्या ठिकाणी या पुस्तकांचे स्टॉल असतात त्याच ठिकाणी हे खोदकाम सुरू आहे.त्यामुळे येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी बौद्ध अनुयायांना प्रचंड त्रास मनःस्ताप होऊन दीक्षाभूमी वर येणाऱ्या अनुयायांची संख्या कमी व्हावी व लोकांना ज्ञान देणाऱ्या साहित्याची विक्री थांबावी यासाठी सौंदर्यीकरणाच्या नावाने दीक्षाभूमी ओसाड पाडण्याचे कटकारस्थान राबविण्यात येत आहे.दीक्षाभूमीच्या लेकरांना आता बसायला सुद्धा जागा राहणार नाही
👉 बांधवांनो आपण फक्त बघत बसायचे का? परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनस्पर्शाने उजळलेल्या व करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या या पावन भूमीला स्मारक समिती च्या परवानगीने उद्ध्वस्त करण्याचे कूटील कारस्थान आपण फक्त बघत बसायचं काय? बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावना जाणिवपूर्वक दु:खविण्याच्या हेतूने दीक्षाभूमी वर सुरू असलेले अंडरग्राऊंड पार्किंगचे बांधकाम संबंधित विभागाने व स्मारक समितीने परिस्थिती स्फोटक होण्यापूर्वी ताबडतोब थांबवावे.