- 416
- 1 minute read
धर्म निरपेक्ष लोकशाहीला सविधांनची गरज आहे.
पाचशे वर्ष अज्ञातवासात असलेल्या राम लल्लाचे मंदिर अयोध्यात उभारून राम लल्लाचे बोट धरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांना अयोध्या मंदिर कडे घेवून जात असलेला फोटो गोदी मीडियातून प्रसारित होत असताना डॉ.बाबसाहेब आंबेडकर लहान मुलाचे बोट धरून त्याला. शाळेकडे घेवून जात असल्याचा फोटो सोशल मीडियातून झळकल.मंदिरात जाणे हिंदू श्वध्देचा आणि धर्म स्वातंत्र्यचा भाग असला तरी नरेंद्र मोदी स्वतःलाच देवाचा अवतार समजू लागले आहेत . श्वध्दा आणि अंधश्वध्दा मधील फरक स्पष्ट होण्यासाठी शाळेत जाणे जास्त महत्त्वाचे आहे.परिवर्तनाची भाषा करणारे वी दा सावरकर यांनी आपल्या गावी मुलांच्या शिक्षणाची सोय होण्यास शाळा उभारणे आवश्यक होते.पण त्यांनी मंदिर उभारल्या वर डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हे कसले विज्ञानवादी हे तर सनातनी आहेत.
गेल्या दहा वर्षात हिंदुं हिंदुत्व आणि हिंदुस्थानची भाषा करणाऱ्या भाजपने राम मंदिरचा मुद्दा करून २०२४ ची लोकसभा निवडणुक लढविण्याचा आपल्या मतदार मध्ये आत्मविश्वास निर्माण करीत असताना सत्तेचा इतका अहंकार की नाशिकच्या प्रचार सभेत एक शेतकरी खालून ओरडुन सांगत होता की विदेशी कांद्याची निर्यात बंद करा.आणि कांद्याच्या भावा बदल बोला पण कांध्यावर भावावर बोलण्यास तयार नसलेल्या मोदींनी
जय शिया रामचे नारे दिले. उभ्या देशाने पाहिले की 2014 ला सबका साथ सबका विकास सबका विश्वास देणारे हेच मोदीजी आहेत का ? बेकारी बेरोजगारी महागाई सर्व प्रश्नाचे एकच उतर राम मंदिर असा मोदी आणि भाजपने भ्रम करून घेतला .
मोदी मोदी करणारे अंध भक्त एक गोष्ट लक्षात ठेवा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलना पासून स्वातंत्र्य मिळाले तरी उभा देश महात्मा गांधीजींच्या प्रेमात त्याच्या सोबत असताना एकटे डॉ.बाबसाहेब गांधीजींच्या विरोधात उभा होते पत्रकार विचारीत होते की डॉ.आंबेडकर तुम्हाला त्याची भीती वाटत नाही का ? त्यावर. डॉ.बाबसाहेब याचे उतर होते की मी नीतिमान शीलवान आणि गतिमान असल्यामुळे कोणाच्या बापाला घाबरत नाही.राहिला प्रश्न गांधीजींचा तर जो इंसान इंसान न बने वह महात्मा क्या बने? स्वतःला देवाचा अवतार समजणारे मोदी यांनी ज्या ७० ठिकाणी मोठ्या रॉलॉ काढल्या मोठ्यांसभा घेतल्या तेथील उमेवार पाडले आहेत.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आणि प्रधान मंत्री पंडित नेहरू याना देखील जगनाथ पुरीच्या मंदिराचे उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आले .धर्मनिरपेक्ष लोकशाहीतील उच्च पदस्थ व्यक्तींनी कोणत्याही धार्मिक सोहळ्यास जाऊ नये अशी प्रधानमंत्री पंडित नेहरू याची इच्छा होती.डॉ.राजेंद्र प्रसाद त्या सोहळ्यास राष्ट्रपती
पेक्षा एक हिंदु म्हणून उपस्थित राहिले.परंतु ती एक प्रथा पडली. राष्ट्रपती त्या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहिले नसते .तर तसा उच्च पदस्थ व्यक्तींनी धार्मिक कार्याला उपस्थित न राहण्याचा पायंडा पडला असता तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीत हिंदू हिंदुत्व आणि हिंदुस्थानच्या नावाखाली राजकारणात धार्मिक अतिरेक केला नसता. जातीचे खोटे सर्टिफिकेट ने निवडून आलेल्या खा.नवनीत राणा यांनी धर्म निरपेक्ष लोकशाहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे याच्या मातोश्रीवर जावून जाहीरपणे हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम आयोजित केला नसता.
गंगा मयाने. मुझे बुलाया म्हणत बनारसा
मधून दोन वेळा निवडून आलेल्या नरेंद्र मोदींनी
गंगा नदीची स्वच्छता किती केली? हा देखीलमोठा संशोधनाचा विषय आहे.नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याना निमंत्रण न देताच आपल्या भोवती भगवाधारी साधू उभे करून सेंगोर नामक धर्मदंड हाती धरून संसद ही धर्मसंसद होणार आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होणार असा आभास निर्माण करून भारताच्या
धर्मनिरपेक्ष लोकशाहीला छेद दिला .अयोध्या राममंदिर उद्घाटनात देश भगवा करताना इतर धर्मियांचा थोडा देखील विचार केला नाही.2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत असताना मोदी तीन वेळा पिछाडीवर होते. आता पर्यंतच्या प्रधानमंत्री मध्ये सर्वात कमी. लिड घेवून मोदी
निवडून आलेले आहेत.
अयोध्या हा लोकसभा मतदार संघ
फैजाबाद मध्ये येतो. .2014 आणि 2019 ला साली निवडून गेलेले भाजप खासदार लल्लू सिंह ठाकुर यांनी राम मंदिर या विषया पलीकडे काही काम केले नाही.समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत पराजीत करण्याची अनेक करणे आहेत. भाजप उमेदवारवर इतर धर्मीय सोडा पण स्थानिक हिंदू समाज देखील नाराज होता.कारण विकासाचा मुद्दा सोडून लल्लू सिंह ठाकुर याचा नारा होता ” अब की बार 400 पार हमे संविधान बदलना है,”मंदिर कॉरिडॉर साठी जमिनी जबरदस्त तर काळा बाजार करून मंदिर समितीने जमिनी बळकवल्याच्या अनेक बातम्या मीडियातून प्रसारित झाल्या होत्या.अयोध्या राम मंदिर कडे जाणारा राम पथ तयार करण्यासाठी २२०० हजार पेक्षा अधिक दुकाने तोडली.८०० घरे ३० मंदिर ९ मस्जिद आणि ६ मजार तोडून स्थानिक लोकांचा भावंना दुखावल्या या शिवाय पर्यटन मधील स्थानिक लाखो लोकांचा रोजगार बाहेरच्या गुजरातीनी हस्तगत करून स्थनिक लोकांना देशोधडीला लावले होते
1992 पासून बाबरी मशिद उध्वस्त करून अयोध्या राम मंदिर प्रश्नावर राजकारण करणाऱ्या संघ परिवार आणि भाजप याना मनोमन खात्री होती की राममंदिर निर्माण मुळे
2024 ची लोकसभा निवडणूक बहुमतात निवडून येऊ परंतु गेल्या दहा वर्षात सबका साथ सबका विकास या नाऱ्याचा विसर पडलेला मोदी हिंदू मुस्लिम तुष्टीकरण करीत आले आहेत.मणिपूर मधील. महिलांची नग्न धिंड असेल , जागतिक कीर्तीच्या महिला खेळाडूवर अन्याय झाला असेल ,या शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला
मोदींनी त्यावर कधीच तत्काळ प्रतिक्रिया देवून त्यांना अभय दिले नाही
गेली दहा वर्षे मन की बात करणारे मोदी
जन की बात एकतच माहीत.राम मंदिर निर्माण मुळे आपले सरकार बहुमनाते येणार असा आत्मविश्वास असलेल्या मोदींना अयोध्येतील सीट वाचविता आली नाही.ही त्याची राजकीय मोठी हार आहे . फैजाबाद मतदार संघात फक्त हिंदू राहत नाहीत या मतदार संघात दलित 26 टक्के मुस्लिम 14 टक्के कुर्मी 12 टक्के ब्राह्मण 12 टक्के आणि यादव 12 टक्के आहेत
भाजप विरुद्ध उमदेवार अखिलेश यादवच्या
समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद बेकारी बेरोजगारी महागाई भष्टाचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संविधान बचाव लोकशाही बचाव चा नारा देत होते.येथील मतदार दलित , मुस्लिम , कुर्मी आणि यादव यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे संविधान वाचविण्यासाठी बसपाला मत न देता समाजवादी पक्षालां म्हणजेच इंडियाला
मत देवून भाजपला पराभूत केले.
भाजपने 1992 साली बाबरी मशिद उध्वस्त केल्या पासून गेली कित्येक वर्षे राम मंदिर आणि हिंदू मुस्लिम वादावर देशात निवडणुका लढविल्या पण अयोध्या मंदिर निर्माण करून देखील राम लल्ला काय मोदी आणि भाजप याच्या मदतीला धावून आला नाही.याचे देशातील आणि विदेशातील हिंदुत्व वादी देव आणि धर्मवेड्या लोकांना आश्चर्य वाटले असेल तरी आंबेडकरवादी अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश मिळण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी. मंदिर बाहेर जन आंदोलन सुरू केले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी गरीब हातावर पोट असलेल्या
लोकांना सोबत घेवून दिवस रात्र उन्ह वारा पाऊस थंडी याची पर्वा न करता सलग पाच वर्ष जन आंदोलन जीवाची पर्वा न करता केले.पण काळा रामाला आपल्या भक्ताची कधीच दया आली नाही. पाच वर्ष कडी कुल्पात बंदिस्त राहिला.तेव्हाच डॉ बाबासाहेब याना खात्री पटली की काळाराम हा देव नाही तर फक्त दगड आहे. दगडावर डोके आपटून आपलाच कपाळ मोक्ष होण्या पेक्षा हे आंदोलन बंद केले पाहिजे. या निवडणुकीत भाजप आणि संघ परिवार याची देखील खात्री पटली असेल की रामाच्या नावाने राजकारण करता येत पण राम मात्र मदतीला धावून येत नाही. धर्म निरपेक्ष लोकशाहीत राम नव्हे तर संविधान चालते.
– आनंद म्हस्के