- 53
- 1 minute read
विचाराची प्रतिमाने एक राजकारण
ज्ञानाचा इतिहास:
ज्ञानाचा इतिहास असतो. इतिहासात ज्ञान असते .पण ज्ञानाला स्वतःचा असा एक इतिहास बाळगत पुढे जावे लागते. माणूस इतिहासात रमतो हे माणसाचे इतिहास प्रेम हे ज्ञानासाठी असते का? जुन्या अवशेषांमध्ये आपल्या पूर्वसरींचा आदर्श शोधण्याचा तो प्रयत्न का करतो? असा तो इतिहास हा त्या कालसापेक्ष संकेत, नियम ,कायदे व समाज मनाची धारणा यातून घडत राहतो .इतिहासाला फक्त नायकच नसतात ,तर इतिहासात अनामिकांचा मोठा वाटा असतो. इतिहास नायकांच्या नावाने लिहिल्या जातो. मात्र अनामिकांचे योगदान हे इतिहासाला पुढे नेते. अनामिकांच्या इतिहासाचे संशोधन, विश्लेषण, पुनर मांडणी नवदृष्टिकोन शोधून ते पुढे आणणे या सर्व ज्ञान क्रिया खूप मोठ्या प्रमाणात कोणत्याही जनसमूहाच्या इतिहासासाठी करण्याची गरज असते .मात्र ज्ञान आणि इतिहास याचे महत्त्व कळालेला समाज संख्येने कमी असतो. त्यामुळे इतिहासाचे अज्ञान ही असते इतिहासाचे महत्त्वही वाटते इतिहासाकडे पुन्हा पुन्हा प्रत्येक पिढी आकर्षित होते इतिहासात त्यांना अडकवले जाते रमावले जाते गुंतवले जाते कथन केलेला त्यांचा इतिहास त्यांच्या माथी मारला जातो हे इतिहासाचे प्रेम आणि राजकारण गुंतागुंतीचे असते ज्ञानाच्या आधारे इतिहासाचे राष्ट्रप्रेम इतिहासातील अनामिकांचे योगदान आणि त्यातून त्या कालखंडातील घडलेल्या घटनांचा बोध आणि शोध यापर्यंत ज्ञानाचे विश्लेषण इतिहासाच्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक पिढीने करून घेण्याची गरज आहे.
मानवी संस्कृतीचां भिन्नतेचा इतिहास हा खूप व्यापक आहे त्या त्या भूभागावरील जनसमुहांचा जगण्याचा अर्थ संघर्ष इतिहासाचेच ते दर्शन असते पण जनसमूह एकमेकावर आक्रमण करून जीत,जेते या स्वरूपात एकमेकांवर भाषा धर्म ग्रंथ ईश्वर प्रार्थना यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांचा इतिहास नष्ट करीत असतात आणि याच इतिहासात ज्ञानाचा शोध घेता येतो एकेश्वर वाद हा नेहमी आपले प्राबल्य वाढवण्याचा विचार करतो पण जगभरच्या मानवी समूहाच्या श्रद्धा आणि उपासना यांचे मार्ग वेगळे असतात यातील भिन्नता थक्क करणारी असते एक ग्रंथ एक ईश्वर एक देश एक भाषा एक संस्कृती एक उपासना पंथ एक प्रकारची आराधना या यातून प्रभुत्वाचा विचार सुरू होतो भिन्नता बहुभाषिकता बहु धार्मिकता बहुविध श्रद्धा या एकेश्वर वादाच्या आड येतात. या सर्व धर्म श्रद्धेचा ईश्वर प्रस्थापनेच्या प्रवासाचा इतिहास जगभरच्या मानवी जनसमुहांचा वेगवेगळ्या आहे तो आघाद आहे. ज्ञान आणि श्रद्धा ही सुद्धा एकमेकाला विरोध करीत पुढे आले आहेत श्रद्धा सर्वांच्या पुढे असते . श्रद्धेला ज्ञान ज्ञानाला श्रद्धा असे मानत समजत अनेक जनसमूह आपला प्रवास करतात विचाराच्या विकासाच्या पातळ्या वाढतात तस तशी मानव जातीची श्रद्धेची जळमटे गळून पडतात पण तरीही ज्ञानाचे आणि श्रद्धेचे वैर व्यक्तिगत माणसांना संपवता येत नाही ज्ञानाचा इतिहास म्हणून विकास म्हणून सतत विचार करायला हवा श्रद्धेचा इतिहास हा धर्मग्रंथ उपासना मंदिर मस्जिद प्रार्थनाग्रह यामध्ये असतो त्यामुळे अपसुकपणे प्रत्येक माणूस श्रद्धेच्या इतिहासाला कवटाळून बसतो श्रद्धेचा इतिहास आणि ज्ञानाचा इतिहास यामध्ये प्राधान्य ज्ञानाच्या इतिहासाला द्यायला हवे हे मोठ्या प्रमाणात प्रत्येक माणसाला प्रतीत व्हायला हवे
ज्ञानाचा इतिहास ही फार मोठी व्यापक उत्क्रांतीतून पुढे आलेली ज्ञानसामग्री आहे. ज्ञानाचा इतिहास हा मानव आणि निसर्ग मानव आणि पृथ्वीचे द्रव्य मानव आणि पृथ्वीचे उत्पात, निसर्ग संहार यांच्या एकमेकांवरील प्रभावातून ज्ञानाचा इतिहास मानवाने तयार करत तो उत्क्रांत झाला आहे .ज्ञानाचा इतिहास अग्नीपूजा ,चक्र, दगड, गुहा ,गुंफा, नदीकाठ, बियाणे,, फुले, शेती, पशुपालन, राजेशाही ते धर्मशाही, या क्रमाने जगभरच्या सर्व संस्कृती चालत पुढे आलेल्या आहेत यामध्ये क्रम आणि प्राधान्य वेगवेगळे आढळतात पण हा सर्व ज्ञानाचा इतिहास आहे ,यात विचार चा इतिहास आहे .याला हा संघर्षाचा इतिहास आहे हा मानवी प्रज्ञेचा विकास आहे मानवी प्रज्ञा आणि ज्ञान हे नेहमी कालानुरूप बदलत असते नव्या भूमिका नवी कृती वेगळ्या विचार पद्धती यातून मानवी प्रज्ञांआणिज्ञान
अविष्कृत होत राहते माणूस हा नेहमी सुटा विचार करतो माणसाला समग्रता पेलत नाही समग्रता ही व्यवहाराची समाज सातत्याची गोष्ट असते समग्रतेमध्ये एक नियमितता तर वर्तनाची नियमपूर्वकता असते समग्रता ही ज्ञानासाठी खूप आवश्यक असते समग्रतेतून विचाराच्या भिन्नता विचाराचे सातत्य विचाराचे नाव नाविन्य विचाराची उपयुक्तता विचाराचे उपयोजन हे सर्व तो समाज निश्चित ठरवत असतो आणि त्याप्रमाणे श्रद्धेला थोडी उसंत देऊन विचारी वर्तन करीत असतो आणि त्यातूनच मानवी सभ्यतेचे समाज घडत असतात यात प्रभुत्व असते हिंसा असते यामध्ये शोषण दमन हे तर प्रचंड असते लिंगभावाची सत्ता असते आणि यामुळे प्रत्येक समाज हा आपल्या सभ्यतेचे वर्तन प्रकार तयार करीत नष्ट करीत नावे स्वीकारत पुढे चालत आलेला असतो ही सर्व नामवाचक गोष्ट असते. देश वाचक वंश वाचक ईश्वर वाचक ही भिन्नता आढळून येते पण प्रभुत्व ही मानवी मेंदूतील नेणीव माणसाला थोडे प्रेम थोडी हिंसा थोडी दया करायला भाग पाडते नेनी वे ने प्रभाव मुक्त माणूस असू शकत नाही माणसाचे हे संमिश्र नैसर्गिक वर्तन हे वेगळेपण आहे भिन्नतेच्या वर्तनातून भिन्न विचाराच्या पद्धतीतून तो पुढे चालत राहतो विचार वस्तू आणि संकटे गरजा आणि उपयोजन यातून विकसित होतो विचार ही मुलताहा प्रवृत्ती माणसाची असते माणूस विचार करतच माणूस बनत चालला आहे माणूस बनण्याची प्रक्रिया पूर्णतः कोणत्या टप्प्यावर परिपूर्ण झालेली नाही मानवी प्रज्ञेचा मज्जा विकासाचा टप्पा आता जवळ आलाय एकूण उत्क्रांतीच्या व्यापक कालखंडाचा विचार करता मानवी प्रज्ञेतील हे सगळे नेनिवेचे प्रदेश तो स्वतः सोबत बाळगत समजावून घेत वाटचाल करतो आहे म्हणूनच ज्ञानाचा इतिहास तयार होतो आहे संघर्षाचा इतिहास संस्कृतीच्या वर्चस्वाचा इतिहास भाषेच्या प्रभुत्वाचा इतिहास शोधांचा इतिहास नष्ट केलेल्या संस्कृती यांच्या कारणाचा इतिहास अशी इतिहासाची असंख्य स्वरूपातील मूर्त व अमूर्त रूपे मानवाने याचे परिशिलन चालवले आहे त्याचा अभ्यास तो करतो आहे पण माणसाचा ज्ञानाचा इतिहास समजावून घेऊन ज्ञानाच्या इतिहासाला परिपृष्ठ करणे पुढे नेणे हे बहुतांश समाजाला महत्त्वाचे वाटत नाही ज्ञानाच्या इतिहासात व्यवस्थांचे संचालन सुयोग्य पद्धतीने तो जनसमूह करू शकतो पण ज्ञानाचा इतिहास दडपने नष्ट करणे आणि एकत्व एकमय याच्या आग्रहातून इतरांच्या प्रती शत्रुत्व ही मानवी नेनिव ही फार घातक ठरत चालली आहे समूह असुरक्षितता अस्तित्व नष्ट होण्याचे भय आणि काळाचा अनंत व्यापक पट याची भीती वाटणारा मानवी समूह हा प्रज्ञाने अभावानेच जगतो तो गरजा आणि प्रतिक्रिया आणि क्रिया या स्वरूपामध्येच वर्तन करत असतो म्हणून मानवी ज्ञानाचा इतिहास ही असुरक्षित ता नाही मानवी ज्ञानाचा इतिहास ही व्यापक एकात्म पृथ्वीवरील सर्व जनसमुहांच्या उन्नयनाची नित्य गोष्ट असते यासाठी ज्ञानाची इतिहासातील प्रस्तुतता व वर्तमानाची परीशीलनता प्रत्येक जनसमूहाला करता आली पाहिजे ज्ञानाचा इतिहास ही मानवी जीवनाची प्रज्ञाची भूक असली पाहिजे भौतिकताही प्रभावित करते ती आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडते भौतिक तेचे आकर्षणही निर्माण होते. हे एका बाजूला मानवी ज्ञानेन्द्रयाला प्रतीत होते पण दुसऱ्या बाजूला ज्ञानाची महत्त्ता ही प्रत्येक जनसमुहाला पटली पाहिजे तसे अधीर वर्तन ज्ञानप्राप्तीसाठी करायला हवे याची आंतरिक ओढ लागली पाहिजे तरच ज्ञानाचा इतिहास नावाचा एक मानव जातीचा संचित समृद्ध ठेवा हा सातत्याने प्रत्येक जनसमूहाला समजून घेण्यास उपयुक्त ठरतो.
ज्ञानाचा इतिहास ही एक व्यापक सर्व भेदा पलीकडील वास्तवाची गोष्ट असते यात वस्तुनिष्ठता असते यात काल निश्चितता असते यात प्रक्षेपित आक्षेपित घटक वगळले जातात ज्ञानाचा इतिहास असा निरपेक्षपणे लिहिणे अभ्यासणे तयार करणे हे ज्ञान समृद्ध समाजासाठी आवश्यक असते आपला समाज आपले गैरसमज आपले आग्रह आपल्या नेनीवा यांची ओझी बाळगून तो शुद्धतेच्या मानसिक वेडा मध्ये स्वतः रममान राहतो. शुद्धतेचां ज्ञान इतिहास जगभरच्या वंशवाद्यांच्याकडून आता लिहिला जातो आहे .वंशवाद हा उत्क्रांत वादाच्या सर्व निष्कर्ष सिद्धांत यांना नाकारून स्वयंशुद्धता प्रस्थापित करू पाहतो आहे. ज्या ज्या समाजाने वं शवादाचे असे प्रयत्न केले तिथे अनेक जनसमूह मारले गेले आहेत.रक्तपात झाला आहे. आणि हिंसेचे तांडव घडलेले घडवण्यात आलेले आहे .
जोपर्यंत ज्ञानाचा इतिहास हा मानवी स्वभावाच्या विचाराचा विषय होत नाही तोपर्यंत मानवी जीवनातील निर्मम हिंसा हे टिकून राहणार आहे हिंसेचे असे चक्र उलटे फिरत राहते हे प्रत्येक कालखंडात घडले आहे हिंसेच्या विरुद्ध लढण्यासाठी मानवी जनसमुहांना विचार आणि सदाचाराच्या पलीकडची धर्म शिकवणुकीची तत्त्वे उपयोगी पडत नाहीत हे समजावून घेऊन नेनिवेचा उद्रेक हा प्रज्ञाविरुद्ध होता कामा नये मानव्याच्या विरुद्ध नेणीव वर्तन करण्यास प्रेरित करते हे होता कामा नये इतका ज्ञानाचा इतिहास मानव जातीने प्राप्त केला पाहिजे अभ्यासला पाहिजे प्रत्येक जनसमुहाला वर्तमान आणि भौतिक प्राप्ती हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट वाटते भोग आणि विकार यांची पूर्तता अशा सुखाच्या व्याख्या प्रत्येक समूह वेगवेगळ्या पद्धतीने कमी जास्त स्वरूपात अशाच करीत आला आहे तरीही सुखही सापेक्ष मनो निर्मित आनंदी सामूहिक सह अस्तित्वाची सर्वोच्च गोष्ट आहे हे जेव्हा मानव जातीला प्रतीत होईल तेव्हा बहुविधता हे एक सह अस्तित्वाचे सम आदराचे भान प्रत्येक जन समूहाला येऊ शकते ते आले पाहिजे असाच ज्ञानाचा इतिहास बहुविधता व सह अस्तित्व यांच्या सर्वोच्च संरक्षण यासाठी आवश्यक आहे बहुविधता व सह अस्तित्व हा मानवी ज्ञानाचा इतिहासाचा निष्कर्ष आहे हा निष्कर्ष विसरणाऱ्या जनसमुहांना वंशवाद हा पुन्हा पुन्हा रक्त संघर्षाकडे पोहोचवतो आणि पुन्हा हिंसेचा इतिहास याची पुनरावृत्ती प्रत्येक कालखंडात होत राहते मानवी विचार हे विकसित होणारे साध्य गोष्ट आहे अद्भुतता अतर्कता ही सर्व नाकारून वास्तवता परिशिलनता अनुभव सिद्धता यांच्या आधारे अतिताचा नाद प्रत्येक जन समूहाने सोडून दिला पाहिजे. ज्ञानाची भार्मकाता ही अध्यात्मतून तयार होते कोणतेही अध्यात्म हे मानवी विचारला अपूर्ण ठरवते विचार आणि प्रज्ञा यांच्या विकासाचा इतिहास हा अध्यात्माला आव्हान देतो मानवी प्रज्ञाने अध्यात्माला विकसितही केले अध्यात्म ही जीवन आधारित पण होती पण ती सर्वकालिक सर्व प्रश्नांची मुक्ती असू शकत नाही कोणताही धर्म कोणताही ईश्वर कोणताही ग्रंथ हा अंतिम आणि एकात्म सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणणे हे मानव जातीच्या प्रवासाचा पूर्णविराम भविष्य ठरवेल मानव जातीचा प्रवास ही निरंतर चालत आलेली गोष्ट आहे ती ज्ञानाच्या इतिहासाबरोबर परिपूष्ट होत् आहे चे तन्यां आणि अद्भुतता यांनी संमिश्र झालेली आहे पण ती स्वतंत्र वेगळी करणे हे ज्ञान क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचे काम आहे इतिहास हे ज्ञान नसते त्याहून वर्तमान हा श्रेष्ठ असतो वर्तमानासाठी ज्ञानाचा इतिहास नेहमी उपयुक्त ठरतो. एकमयता ही विशालता असायला हवी ती मानवी सीमित असायला हवी ती चैतन्य आणि अध्यात्म या दिशेने पुढे जर जाऊ लागली तर धर्म भेदाच्या भिंती उभ्या राहतात धर्म हा अनुयायाचा आणि संप्रदायाचा श्रद्धेचा विषय बनतो आणि समर्थनासाठी तिथे रक्त संघर्ष होतो या इतिहासातीलपराभूत कारणांच्या साठी वर्तमानाची अवेह ल ना मानव जातीकडून पुन्हा पुन्हा होते हे सर्व संप्रदाय धर्म बांधव यांच्याबाबत हे वर्तन घडते म्हणून ज्ञानाचा इतिहास हे राजकारण न बनता ती वर्गवारी न बनता ते विचाराचे प्रतिमान मॉडेल न बनता एक सर्वकालिक सर्व स्वीकारहार्य सर्व उपयुक्त अशी व्यापकता या क्षेत्राला येण्याची गरज आहे आणि ही सुद्धा एक ज्ञान इतिहासाची मानवी प्रज्ञाची आव्हान गोष्ट आहे ती सतत मानवी प्रज्ञाने चिंतनाने वाचनाने अभ्यासाने समजावून घेणे हे सर्वच जनसमुहाचे नित्य कर्तव्य असले पाहिजे तरच ज्ञानाचा इतिहास हा जनवर्तमानातील जनसमुहांना मागे खेचणार नाही
ज्ञानाच्या
इतिहासात स्वयंविचाराची अनेक प्रारूपे तयार केली जातात ती लाद ली जातात त्याचा प्रसार होतो अनेक विकसित राष्ट्रांच्या मध्ये अर्ध साक्षर समाजामध्ये याचा स्वीकार होतो आणि प्रतिमानांची चर्चा होते प्रतिमानांना सत्य मानले जाते त्याचा गौरव होतो आणि ती अर्धसाक्षर समाज जीवनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होतो. विचाराची प्रतिमाने अनेक असतात ती समजावून घेणे . ही ज्ञानवृत्ती प्रत्येक जन समूहामध्ये आवश्यक आहे. भाषा केंद्रित वंश केंद्रीत जात केंद्रित प्रादेशिक आधारभूत ईश्वर केंद्रित अशा अंगाने विचार करणारी प्रारूपे ही संकीर्ण वादाकडे पोहोचतात पण बहुविधता बहुसंस्कृतिकता बहुभाषिकता नव्या व प्राचीन भिन्न सभ्यता या सुद्धा स्वीकारहार्य असल्या पाहिजेत त्या टिकल्या पाहिजेत मानवी जीवनाची भिन्नता ही नष्ट करून एकमयता निर्माण करणे हे विरोधी वर्तन आहे हे आता समजावून घेण्याची गरज आहे अखिल भारतीय त्व अखिल हिंदू पन इस्लाम जागतिक बुद्धिझम जागतिक प्रोटेस्टनट जागतिक आयरिश जागतिक जुडाईझम अशा असंख्य वादाचा हा जगाचा प्रवास हा चालू आहे हा ज्ञानाच्या इतिहासाकडून नव विचार प्रति माने स्वीकारण्याकडे कसा जाईल? हे पाहणे खूप महत्त्वाचे यामध्ये सर्वतः सह अस्तित्वाचा श्रेष्ठ आदर्श जपणे खूप आवश्यक आहे ज्ञानाच्या इतिहासात विचाराची प्रतिमाने सापडतात त्यासाठी साचेबंद समाजाने राष्ट्र तयार करण्याची गरज नाही भिन्नता ही अद्भुतता नाही भिन्नता ही निर्मिती आहे वास्तव आहे समाज जीवनाचे एक थक्क करणारे असे ते दर्शन आहे भिन्नता ही आंतरिक आसक्ती असते एकात्म एक सुरी एकसाची एक भाशी एक वंशी एक ईश्वरवादी समाज स क्तीने तयार करण्याचे प्रयत्न हे जगाच्या प्रवासात नेहमी यशस्वी झाले आहेत त्यातूनच रक्तपात अशोकाच्या कालखंडात वैदिकांच्या कालखंडात झाल्याचा इतिहास इथे पुढे आला आहे त्यामुळे ज्ञानाचा इतिहास व विचाराची प्रतिमाने ही वर्गीकरणाच्या ऐवजी सर्वव्यापक सर्व आदर यांनी नि कशावरची मानव जातीने नव्याने तयार करण्याची गरज आहे असे ज्ञानाचा इतिहास आणि विचाराची प्रतिमाने यांचे राजकारण समजावून घेताना ही विचार पुढे येतात म्हणून ते शब्द बंद केले आहेत
– शिवाजी रोत (सातारा)