• 702
  • 1 minute read

नव नालंदा विद्यापीठ निर्मिती

नव नालंदा विद्यापीठ निर्मिती

भारताचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीची शपथ घेलेले नरेंद्र मोदीं यांनी  १९ जून  २०२४ रोजी भारत आणि  पूर्व एशिया शिखर संमेलन सुरू होण्यापूर्वी नालंदा विश्वविद्यालय न्यू कैंपसचे उद्घाटन. केले.त्यावेळी भारताच्या प्रगत शैक्षणिक प्रयत्नांच्या चिरस्थायी भावनेचा आणि भारताच्या G20 प्रेसिडेन्सी थीम, वसुधैव कुटुंबकम यांच्याशी सुसंगत जागतिक समुदाय तयार करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचा जिवंत पुरावा   म्हणजे G20 परिषद मध्ये उपस्थित १७ देशाच्या प्रमुखांना
राष्ट्रपती द्रोपती मूर्मु याच्या हस्ते नालंदा विद्यापिठाची प्रतिकृती भेट देण्यात आली 
       भारताचा गौरवशाली इतिहास  सांगणारे प्राचीन  नालंदा विद्यापीठ ख्रिस्त पुर्व ६ व्या शतकात ज्ञानाचे केंद्र होते. १२ व्या शतकात खिल्जीने हे साम्राज्य उद्धस्त करण्यापुर्वी जगातील  जवळपास १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत तर देशोविदोशीचे २००० शिक्षक शिकवीत होते. नालंदा येथे शिकवणारे काही उल्लेखनीय विद्वान हे नागार्जुन (सर्वात महत्त्वाचे महायान तत्त्वज्ञ), दिनागा (भारतीय तर्कशास्त्रातील बौद्ध संस्थापकांपैकी एक), धर्मपाल (बंगाल प्रदेशातील पाल साम्राज्याचे दुसरे शासक) बुद्धपालिता, शांतरक्षिता और आर्यदेव असे महान विद्वान शिक्षक होते.चिनी यात्री ह्वेन सांग, फाह्यान आणि इत्सिंग यांनी सहा वर्ष राहून नालंदा विद्यापीठ
मध्ये शिक्क्षण घेतले. विद्वान ह्वेन सांग याने आपल्या देशी जाताना बौद्ध धम्माचे ६०० ग्रंथ सोबत घेवुन गेले.जगातील सर्वात प्राचीन
विद्यापीठां पैकी एक म्हणून नालंदा विद्यापीठ
ओळखले जाणार आहे.
       प्राचीन काळी नालंदा विद्यापीठ मध्ये अभ्यासक्रमात फक्त बौद्ध धम्मच नव्हे तर वैदिक धर्मशास्त्रे. वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, , ज्योतिष, व पाणिनीसूत्रे , तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, मेटाफिजिक्स, वैद्यकशास्त्र अश्या ६४  कलाचे शिक्षण दिले जात होते.सध्याच्या  शिक्षणाचे फक्त भगविकरण करणाऱ्या सरकार आणि शिक्षण मंत्री यांनी नालंदा विद्यापीठचा आदर्श घेतला पाहिजे.कारण त्यावेळी विविधता, योग्यता, विचारस्वातंत्र्य, सामूहिक शासन, स्वायत्तता आणि ज्ञानाची देवाणघेवाण लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत असेच शिक्षण दिले जात होते.नालंदा विद्यापीठ हा जगासाठी ज्ञानदीप होते.
        बख्तियार खिलजीने इसवी सन ११९० मध्ये नालंदा विद्यापीठाचे साम्राज्य. उध्वस्त करण्या पूर्वी विद्यापीठाचे ३०० शिकविण्याचे रूम होते. सात मोठे सभागृह होते.जगाला प्रज्ञावान करणारी नऊ मजली  ९० लाख ग्रंथाची लायब्ररी होती.अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा. म्हणजे जगाच्या ७५ टक्के ज्ञानाचा साठा होता.नालंदा विद्यापीठाला किल्ला समजून उध्वस्त करण्यात आले.नऊ मजली लायब्ररीला आग लावण्यात आली.ही आग सलग तीन महिने पेटत होती.जगातील पहिले उच्चतम दर्जाचे  विद्यापीठ जळाल्याने मानवी समतेचा विचार तीन हजार वर्ष मागे पडला.
       भारताच्या वैभवशाली नालंदा विद्यापीठ
साम्राज्याचा ऱ्हास झाला.त्या नंतर भारतावर अनेक देशांनी राज्य केल्याचा इतिहास साक्षी आहे.१५० वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी भारतीयांना गुलामा प्रमाणे वागविले.त्यात ब्राह्मण पुरोहित यानी देव धर्म आणि  याच्या धार्मिक गुलामगिरीतून देव धर्म आणि धार्मिक
गुलामगिरीत जखडून टाकले होते.त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग महात्मा फुले यांच्या नंतर डॉ.बाबसाहेब आंबेडकर दाखवीत होते.डॉ.बाबसाहेब याचा क्रांती आणि प्रतिक्रंती हा ग्रंथ समजून घेण्याची गरज आहे. कारण  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पंचशीलचे समर्थक केले नसते डॉ
बाबसाहेब भारताची राजमुद्रा अशोक स्तंभ आणि  राष्ट्र  ध्वजवर अशोकचक्र याना स्थान देऊ शकले असते ? एकाकी लढत असलेले डॉ.बाबसाहेब यांनी बुद्धभूमी भारताच्या सात बारा वर सम्राट अशोकाचे नाव कोरून देशाचा राज्यकारभार करण्यासाठी संविधानाच्या पाना पानात बुद्ध पेरला.
          स्वातंत्र्या नंतर  बुद्ध सम्राट अशोकाचा भारत असलेल्या भूमीतील ८०० वर्षां पासून नालंदा विद्यापीठच्या भिंती ,  ओरडुन सांगत होत्या की आमचेही पुनर्निर्माण करा.जागतिक कीर्तीचे जगातील पहिले असलेले नालंदा विद्यापीठ याच्या नव निर्मितीसाठी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी २० नोव्हेंबर १९५० उद्घाटन
आधारशिला लावली..भिक्षु जगदीश कश्यप यानी बिहार सरकारकडे “मगध इंस्टीट्यूट करिता
विनंती करून  “मगध इंस्टीट्यूट ऑफ पोस्ट-ग्रेजुएट स्टडीज एंड रिसर्च इन पाली एंड एलाइड लैंग्वेजेज एंड बुद्धिस्ट लर्निंग” नावाची एक शोध संस्था  स्थापना करून १९५५  साला पर्यंत देवनागरी लिपि मध्ये  संपूर्ण पाली त्रिपिटक  ४१ खंड प्रकाशित केले.
        स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात बिहार राज्याला २३ मुख्यमंत्री झाले.दिर्घ काळ सत्तेवर लालु प्रसाद राबडी देवी होत्या. मागासवर्गीय मधून पाशी पासवान तीन वेळ तर पी बी मण्डल एक वेळ मुख्यमंत्री राहिले.जगातील पवित्र भूमी बुद्ध गया है प्राचीन काळापासून पर्यटनाचे केंद्र राहिले आहे.
जगातील सर्व बौद्ध राष्ट्राची येथे महा बुद्ध विहार निर्माण करण्यात आली आहेत.जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र असलेल्या बिहार सरकारल प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले नालंदा विद्यापीठ निर्माण करावेसे का वाटले नाही? सनातनी नाही.पण मागासवर्गीय असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तरी नालंदा विद्यापीठ निर्माण करण्याचा कधीच
प्रियतम केलेला दिसत नाही.कारण बिहारचे जगजीवन राम भारताचे उपप्रधान मंत्री होते. राम विलास पासवान तर सरकार कोणतेही असो सलग सात वेळा केंद्रात मंत्री होते .मिरा कुमार काँग्रेसच्या लोकसभा स्पीकर होत्या. नितीन मांझी बिहारचे मुख्यमंत्री होते.कित्येक वर्षे बोगस डिग्री मिळविण्यात बिहारला बदनाम केले जात होते.त्याची चीड येवून जरी नालंदा विद्यापीठची बिहार सरकारमे नवं निर्मिती करण्याची गरज होती.
                    बुद्धम् शरणम् गच्छामी
म्हणजे बुध्दाला नव्हे तर स्वतःच्या बुद्धीला शरण जाणे होय. ज्ञान प्राप्तीची  अवस्था म्हणजे बुद्ध होय. जागृत अवस्था ही  धर्म पंथ जात भाषा आणि प्रांत याच्या पलीकडे जावून मानवी कल्याण आणि विकासाचा विचार करीत असते.धर्माने मुसलमान असेल तरी
राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी चंद्रावर यान पाठवून भारताला जगाच्या प्रगत राष्ट्राच्या पागतीत बसविले.बिहार! विधिमंडळामध्ये २००७ साली
आपल्या भाषणात प्राचीन जागतिक कीर्तीचे नालंदा विद्यापीठाचां  गौरवशाली इतिहास मांडून बिहार सरकार कडे पुन्हा नव्याने नालंदा विद्यापीठ  सुरू करण्याची मागणी केली.यावर भारतात चर्चा झाली नसली तरी २००७ साली
फिलिपाईन्सच्या  दुसऱ्या आशियाई शिखर परिषद मध्ये चर्चा झाली.वाढता दहशतवाद पर्यावरणाचां बिघडणारा समतोल आणि वाढती बेकारी बेरोजगारी ही संपूर्ण जगाची समस्या असून माणसांनी माणसाशी माणसा सारखे वागण्यासाठी बौद्ध तत्त्वज्ञानाची गरज आहे.त्या पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी बिहारच्या बुद्ध भूमी  प्राचीन नालंदा विद्यापीठ जवळच नव नालंदा विद्यापीठ स्थापन करण्याची जगातील १७ देशानी नुसती. मागणी केली नाही तर आर्थिक निधी देण्याचे घोषित केले.
           थायलंड मध्ये चौथी आशियाई शिखर परिषद ऑक्टोबर २००९  झाली. त्यामध्ये देखील नालंदा विद्यापीठ निर्माण बदल भारत सरकारला विचारण्यात आले.१७ देशांनी आपला निधी देखील देऊ केला.अखेर तत्कालीन पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग यांनी  नालंदा विद्यापीठ मंटर ग्रुप स्थापन करून  राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांना अध्यक्ष म्हणून आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन याची सचिव म्हणून  नियुक्ती केली आणि  २५ नोव्हेंबर २०१० रोजी नालंदा विद्यापीठाच्या स्थापने साठीचा कायदा मंजूर  केला.केंद्राने पुढाकार घेतल्यामुळे बिहार सरकारने नव नालंदा विद्यापीठ  निर्माणसाठी प्राचीन नालंदा विद्यापीठ जवळ  ५०० एकर जमिन उपलब्ध करून दिली.विश्वविद्यालय अनुदान आयोगाने एकूण २७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.सर्वसामान्यपणे  विद्यापीठे ही केंद्रीय शिक्षण संस्था या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असला तरी  नालंदा विद्यापीठाचा कारभार हा परराष्ट्रसंबंध मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालतो.
          अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते   डॉ. अमर्त्य सेन हे नव नालंदा विद्यापीठचे ३०१४ पर्यंत  सचिव होते. मोदी याच्या हिंदू राष्ट्रवादाच्या विचारसरणीशी . अमर्त्य सेन याचा विरोध होता.म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये . अमर्त्य सेन यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपती पदासाठी दुसऱ्यांदा निवडीला विरोध केला.कारण अमर्त्य सेन म्हणत होते की मोदींची भारतीय लोकांमध्ये भीती निर्माण करणे लोकशाहीविरोधी आहे. “जॉन स्टुअर्ट मिल यांच्याकडून आम्हाला माहित असलेली मोठी गोष्ट म्हणजे लोकशाही हे चर्चेद्वारे सरकार असते आणि जर तुम्ही चर्चेला घाबरत असाल, तर तुम्ही मते कशी मोजलीत तरीही तुम्हाला लोकशाही मिळणार नाही.हे दहा वर्षा नंतर स्पष्ट होऊ लागले आहे. परंतु  तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या याच्या कार्यकाळात २०१४ साली नव नालंदा विद्यापीठ सुरू करण्यात आले.प्रथम दर्शनी ३० देशातील १४००, विद्यार्थिनी प्रवेशासाठी नाव  नोंदणी केली.परंतु 30 विद्यार्थीसाठी  ११ प्राध्यापक याची नियुक्ती करून शिक्षणाला  सुरुवात करण्यात आली.  सध्या ३०० विद्यार्थी आणि ५० संशोधक विद्यार्थीसाठी ३० प्राध्यापक  आहेत.तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज याच्या हस्ते नालंदाच्या आधुनिक अवतारात औपचारिक उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी स्वराज म्हणाल्या की, भूतकाळातील हे नालंदा  विद्यापीठ देशाला ज्ञानाच्या माध्यमातून जगाशी जोडण्यासाठी ‘सेतू आणि पाया’ म्हणून काम करेल.
     केंद्र सरकार शिवाय बिहार सरकारने
कधीच नव नालंदा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही.याला अपवाद मुख्यमंत्री  नितीश कुमार आहेत.त्यांनी पाठणा  स्टेशन वरील बौद्ध देखावा आणि  बुद्ध पार्क हे प्रेक्षणीय बनविले आहे. तसे पाहता काँग्रेस कडे दिर्घ काळ सत्ता होती.पण  भारतीय संविधान  शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर याच्या पवित्र स्थळा प्रमाणे नव नालंदा विद्यापीठ देखील भाजपाच्या कार्यकाळात सुरू झाले असल्याचे वास्तव मान्यच करावे लागेल. बुद्धगया ही सनातनी याच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी
भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी अनेक वर्ष जन आंदोलन केली आहेत.तसेच प्राचीन काळातील जागतिक कीर्तीचां नालंदा विद्यापीठ
निर्माण करण्याची बुद्ध गया इतकी मागणी कधीच जोर धरल्याचे दिसले नाही. परंतु जगातील सर्व विद्यापीठात फक्त डिग्री मिळतात पण बौध्द धम्म ज्ञानाचा पाया असलेल्या नालंदा विद्यापीठ मध्ये प्रथम माणूस घडला जातीय.ज्याला माणसाने माणसाशी माणसा सारखे वागण्याची जाणीव निर्माण होते.माणसातील माणुसकी जागृत होते तेव्हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा निसर्गाशी निगडीत विचार केला जातो.बुध्दाची शिकवण आहे की,तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे !

– आनंद म्हस्के (चेंबूर)

0Shares

Related post

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…
धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

देश के मातम के माहोल को संघ और मोदी सरकार जिम्मेदार…!        पुलवामा के…
वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन… मला लहानपणापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड. वडिलांनी घरात एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *