बाबासाहेब – माता रमाई आंबेडकर: विवाह स्थळाचे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा ज्या ज्या मातीवर उमटल्या त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे- येत आहे, परंतु त्यांच्या आयुष्यातल्या विवाह या अत्यंत महत्वाच्या क्षणाचे स्मारक उभारण्यात आले नाही. भीमराव आंबेडकर यांचा विवाह दिनांक०४ एप्रिल १९०६ रोजी मुंबईच्या हबीब मासळी मार्केट, सुंदर गल्ली, भायखळा (पश्चिम) येथे रात्री आठ नंतर पार पडला. या ठिकाणी बाबासाहेब व आईसाहेब यांच्या विवाहाची स्मृती जागवावी म्हणून तेथे स्मारक उभारले जावे यासाठी दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार शिवसैनिक मा. अरविंद सावंत यांची ज. वि. पवार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २९ जून २०२४ रोजी सायं. ६ वाजता एका शिष्टमंडळाने भेट घेतली व निवेदन सादर केले. मा. सावंत साहेबांनी याबाबतीत सकारात्मक भूमिका घेतली व महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने हे स्मारक उभारण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात ज. वि. पवार, सचिन आवारे, शिवसैनिक हेमंत कदम, विश्वनाथ जाधव, शुभम खळदे, जिया शेख व गंगाराम जाधव यांचा समावेश होता.