• 402
  • 1 minute read

दिक्षाभूमी वर झालेला जनक्षाेभ म्हणजे सरकारचे अपयश – डॉ. नितीन राऊत

दिक्षाभूमी वर झालेला जनक्षाेभ म्हणजे सरकारचे अपयश – डॉ. नितीन राऊत

दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगविराेधात जनक्षाेभ उसळला व काल त्याचे पडसाद उमटले. आज म.वि.स. नियम ५७ नुसार विधानसभेत नव्या विकास आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामाबद्दल सविस्तर चर्चा करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केली असतांना शासनाने ही मागणी फेटाळली आहे. यावरून असे निदर्शनास आले की राज्य सरकारकडून या विषयावर चर्चेकरिता कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. काल झालेला जनक्षाेभ म्हणजे या ट्रिपल इंजिन सरकारचे अपयश आहे. अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी राज्य सरकार वर टिका केली.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी सक्रिय पावले उचलण्यात सरकार कमी पडत आहे. यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करुन घेतला आहे. सरकारचा हा खोटारडेपणा यापुढे चालणार नाही. मी या प्रश्नावर प्रखरपणे विधानसभेत आवाज उठवणार म्हणजे उठवणार अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

1) ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत मानवी हक्कांसाठी आहे, अशी गर्जना संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासात अजरामर झालेल्या चवदार तळ्याच्या पायथ्याशी केली होती. परंतु आजची अवस्था धक्कादायक आहे. चवदार तळ्याचे पाणी आम्ही आजही पिऊ शकत नाही. त्यामुळे अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या धर्तीवर या ठिकाणी पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ओझोनचा वापर करून येथील पानी पिण्यायोग्य करणार काय?

2) पाणी हा प्रत्येक सजीवाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येक सजीवाने मान्य करायलाच हवा, अशी समतेची भूमिका घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह केले होते. यावर्षी या सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण होणार आहे. यानिमित्ताने महाडला हजारो आंबेडकरी अनुयायी दाखल होतील, अनेक कार्यक्रमाचं आयोजन महाडसह संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे तसेच चवदार तळ्याचं पाणी प्राशन करुन भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतील. त्यामुळे महाराष्ट्र शासन येथील पाण्याच्या निर्जंतुकीकरण करुन चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष साजरे करणार काय?

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचं जिथं लग्न झालं त्या भायखळा मार्केट मध्ये मोठया जल्लोषात दरवर्षी यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. महामानव यांच्या उपस्थितीत पावन झालेल्या भायखळा बाजारात त्यांचे प्रतीक म्हणून स्मारक उभारणार आहे काय?

महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर येथील विकास वेगाने होऊ शकतो. जी तत्परता सरकारने दिक्षाभूमी वर भूमिगत वाहनतळ करायला दाखविली, त्याच प्रकारची प्रबळ इच्छाशक्ती येथे कां दाखविली जात नाही? असे तीन महत्वाचे प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केले.

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *