• 477
  • 1 minute read

हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १२०पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी…

हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १२०पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी…

आपल्या देशात नैसर्गिक मृत्यू कमी व अपघाती मृत्यू जास्त होताहेत की काय अशी शंका यावी इतके हे प्रमाण वाढले आहे.
ठळक कारणे :
* अल्पवयीन व तरुण लक्ष्मीपुत्रांच्या हातात आलेली भरधाव वेगवान वाहने दिवसा-रात्री बेदरकारपणे रस्त्यावरील लोकांचे, त्यांची काहीही चूक नसताना जीव घेत आहेत.
* रस्त्यावरील अपघात : द्रुतगती मार्ग, सिमेंटच्या रस्त्यांवर टायर फुटणे, मोठ्या बसेसच्या ड्रायव्हरवर असलेला ताण, मेंटेनन्सचा अभाव, मद्यपान.
* दुर्गम प्रदेशातील घाट रस्ते : यांत मुख्यतः दरडी कोसळण्याच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.
* रेल्वे व विमान : अपघातांचे प्रमाण खासगीकरणानंतर वाढले आहे. विमानतळ व रेल्वे स्थानके एकाच पावसात गळू लागतात.
* पावसाळ्यातील पूर : शहरांमधील नैसर्गिक नदी,ओढे व नाले यांचा केलेला संकोच व सिमेंटचे रस्ते यामुळे प्रत्येक मोठे शहर पावसाळ्यात पाण्याखाली जाते. समुद्रकिनारी असलेल्या शहरांची परिस्थिती आणखी बिकट.
* देवदर्शन : घाईघाईने रात्री अपरात्री प्रवास, क्षमतेपेक्षा जास्त लोक वाहनात घेणे, एका दिवसात अष्टविनायक उरकणे, विशिष्ट दिवशीच जाण्याची पद्धत – उदाहरणार्थ – शनि अमावास्येलाच जाण्याच्या सर्वांच्या हट्टामुळे रस्त्यावर ताण. याशिवाय जत्रा यात्रा यांत होणारे भीषण अपघात.
* ध्वनी प्रदूषणाचे बळी : लग्न, गणेशोत्सव व तत्सम सार्वजनिक मिरवणुकीत होणारा डीजेचा दणदणाट.
* बाबा लोकांचे सत्संग व तिथली कोसळणारी व्यवस्था. चेंगराचेंगरी.
* यात्रा जत्रा सण : उत्सवातील घातकी व अतिरेकी परंपरा. जसे की दहीहंडीत दरवर्षी होणारे गोविंदांचे अपघात.
* पतंग महोत्सव : दरवर्षी दुचाकी स्वारांचा, पायी चालणारांचा मांजाने गळा कापला जातो.
* पर्यटन : ठराविक ठिकाणी प्रचंड गर्दी. दुर्गम गडकोटांवर आता जीवघेणी गर्दी, समुद्राच्या भरतीचा अंदाज नसणे, धरण परिसरात अतिउत्साहात पाण्यासोबत वाहून जाणे.
* राजकीय पक्षांचे मेळे : विशेषतः साडी वाटप किंवा तत्सम वस्तू वाटपात गर्दी जमून ती नियंत्रणाबाहेर जाते व चेंगराचेंगरीत लोक मरतात.
* प्राणी : रस्त्यावर मोकाट हिंडणाऱ्या गाय, म्हैस, बैल, गाढव, घोडा, कुत्री यांचा सुळसुळाट. त्यात मरणारे जीव.
* वन्यजीव : बिबटे, रानगवे, रानडुक्करे, वानरे यांचा विशेष उपद्रव.
* शहरातील टोळीयुद्धे : हे जरी आपसात होत असले तरी कधी कधी त्यात निरापराध लोक अकारण मारले जातात.
* जातीय धार्मिक विद्वेषाच्या दंगली : यात मॉब लिंचिगचे प्रमाण धार्मिक ध्रुवीकरणात वाढले आहे. नव्या भांडवली उत्पादन संबंधातही निमसरंजामी हितसंबंध टिकून असल्याने जातीय ओळखी पूर्णपणे मिटल्या नाहीत. पूर्वास्पृश्य जातींना, आदिवासींना छळले नाही वा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला नाही, असा दिवस जात नाही.
* सेल्फी : स्मार्टफोनमुळे सेल्फी काढणे, रील बनविणे यांतील आचरटपणा वाढतच चालला आहे. हे अपघात ओढवून घेतले आहेत ते तरुणाईने.
* जाहिरातींच्या होर्डिंग्जचे व बेकायदा गगनचुंबी इमारतींचे बळी : सुरक्षेचे मानदंड झुगारून होर्डिंग्ज उभी राहतात तशीच हे मानदंड झुगारून बेकायदा इ‌मारती देखील अपघातांना निमंत्रण देतात. पूररेषेची मर्यादा पाळली जात नाही.
* कौटुंबिक व व्यावसायिक ताणतणाव : प्रचंड गतिमान अशी स्पर्धात्मकता आणि पराकोटीची विषमता मिळून जीवनात नैराश्य व्यसनाधीनता वाढली आहे. कुटुंबांतर्गत कलह घेऊन माणसे रस्त्यावर येतात तेव्हा होणारे वाहन अपघात किंवा राहत्या घरी आत्महत्या.
* शेतकरी, बेरोजगार, छोटे व्यापारी : यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
* विद्यार्थ्यांच्या आत्महत्या : हा एक नवा गुंतागुंतीचा विषय आहे. यांत पालकांनी लादलेली अतिरेकी स्वप्ने. विद्यापीठातून, प्रतिष्ठीत शैक्षणिक संकुलातील दलित, आदिवासी, भटके या उपेक्षितांना हिणकस वागणूक दिल्याने होणारी संस्थात्मक हत्या.
* सार्वजनिक आरोग्य व्यवस्था : ही नाममात्र उरली आहे. उपचार घेण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स व औषध कंपन्या यांनी चालविलेल्या लुटीत लोक धास्तावून उपचारांच्या अभावी मरत आहेत. यांची निश्चित आकडेवारी नोंदविली जात नाही.
* महागाई व कुपोषणांचे बळी : ही दृष्टीआड घडणारी गोष्ट असली तरी यांत मरणारांची संख्या लक्षणीय आहे.

– किशोर मांदळे

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *