एकाच टप्प्यात सर्व निवडणुकांचे मतदान आणि 24 तासात निवडणूक निकाल
1.एकाच टप्प्यात सर्व निवडणुकांचे मतदान आणि 24 तासात निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले.
2. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे आपल्याकडे ज्याला लोकसभा म्हणतात. त्यांच्या 650 जागा एका टप्प्यात मतदान झाले आणि 24 तासात त्याचे निकाल जाहीर करण्यात आले
3.सर्व जागांसाठी ईव्हीएमचा नाही तर बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला निवडणुकीत मतदान तिथल्या स्थानिक वेळेनुसार रात्री 10 पर्यंत चालले.
4. गुरुवारी रात्री दहापर्यंत चाललेले मतदान मतदान संपताच त्याची मतमोजणी सुरू झाली आणि सकाळी शुक्रवारी नऊ वाजेला निकाल जाहीर झाले.
5. अशाप्रकारे 650 जागांसाठी एकाच टप्प्यात बॅलेट पेपरवर मतदान घेऊन 24 तासांच्या आत त्याचा निकालही लागला.
6. या निवडणुका पार पाडण्यासाठी ब्रिटनमध्ये कोणताही निवडणूक आयोग नाही. स्थानिक स्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी मतदानाची सर्व प्रक्रिया पार पाडतात आणि निकाल जाहीर करतात.
7. मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या एजंट सोबतच तिथले विविध माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार उपस्थित होते.
8. या निवडणूक निकालानंतर मतदारसंघ निहाय डेटा संकलित करण्याचे काम आणि ते तपासून त्याचा तपशीलवार निकाल जाहीर करण्याचे काम तिथल्या लोकसभेतील ग्रंथालय पार पाडत असते. आणि ब्रिटनचे इलेक्टोरल कमिशन हा रिपोर्ट प्रकाशित करते. यात मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानचा तपशील लोकांच्या माहितीसाठी सार्वजनिक केला जातो.
9. लेबर पार्टीचे केयर स्टारमार यांच्या नेतृत्वात ब्रिटनच्या लेबर पार्टीने 650 पैकी 410 जागा जिंकून ही निवडणूक जिंकली आहे.
10. अत्यंत पारदर्शक निवडणुकांसाठी बॅलेट पेपरचा वापर करून पाश्चात्य देशांमध्ये निवडणुकीचे पावित्र्य राखले जाते.
भारतीय वंशाचे आणि मोठ्या भारतीय उद्योजकाचे जावई असलेले ऋषी सूनक तिथल्या कंजर्वेटिव्ह पार्टीचे म्हणजे टोरी पक्षाचे मावळते पंतप्रधान आहेत. लेबर पार्टीच्या विरोधात शेवटपर्यंत प्रचार करताना लेबर पार्टी सत्तेत आली तर आपणास अधिकाधिक कर भरावा लागेल ही भीती त्यांनी संपूर्ण प्रचार कालावधीत ब्रिटिश मतदारांना दाखवली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
ऋषी सूनक यांची कन्सर्वेटिव्ह म्हणजे टोरी पार्टी सपशेल पराभूत झाली आणि लेबर पार्टीचा दणदणीत विजय झाला.
आम्ही संसदीय लोकशाही संरचना पाश्चात्त्यांकडून घेतली पण पाश्चात लोकतांत्रिक वर्तन अजूनही अंगवळणी पाडून घेणे बाकी आहे.
आपल्याकडे असंख्य टप्प्यात लोकसभेचे मतदान. त्यानंतर निवडणूक मतदान मोजणीला लागणारा प्रदीर्घ कालावधी. या दरम्यान एक्झिट पोलचा भांडवली बाजार उधाणाला पोहोचलेला असतो. तो शेअर बाजार खेळवण्यासाठी.