• 101
  • 1 minute read

अरे माणसा…

अरे माणसा…

अरे माणसा,
होशील कधी माणूस,
मी पणाच्या नादात,
करशील किती नासधूस…

जन्मला तेव्हा,
होता अगदी निरागस,
दिसे का तो चेहरा,
इतका कासावीस….

चकाके ते सारेच,
सोने नसते रे,
मृगजळ मोहात,
उगीच पडू नको रे…

दिसती जे आज,
ते उद्या नसणार,
काही ना शाश्वत,
सत्य हेच चौफेर…

भूक का भागेना,
पोट तर चिमुटभर,
नको रे ओरबडने,
देह गड्या नश्वर…

गेलीना वेळ,
जाण माणूसपण,
जन्म एकदाचा,
सोड अमाणूसपण…

– प्रकाश डबरासे

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *