• 29
  • 1 minute read

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज : ना. डॉ. रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज : ना. डॉ. रामदास आठवले

मुंबई दि.१० जुलै – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज असून प्रस्थापित पक्षांच्या आयटी सेल इतकीच भरीव कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नव्या दमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असं आवाहनही आठवले यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या सोशल मीडिया व आयटी सेलच्या प्रशिक्षण व संवाद शिबिराला संबोधित करताना ते बोलत होते. आतिश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयटी सेलची बांधणी संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे. आपले सायबर पँथर्स पक्षाची बाजू चांगल्या प्रकारे मांडत आहेत. पण सोशल मीडियावर विरोधकांकडून अनेक वेळा विचित्र भाषेचा प्रयोग केला जातो. अशा परिस्थितीत शांतपणे उत्तर देऊन आपल्या पॉलिटिकल भूमिकेची मांडणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला आपली गोष्ट पटलीच पाहिजे असे नाही, मात्र लोकशाहीच्या मूल्यांना धरून आपली भूमिका मांडायला हवी.

आठवले पुढे म्हणाले की पक्षाची ध्येयधोरणे, भूमिका आणि उपलब्धी सोशल मीडियावर प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच पॉलिटिकल सायबर वॉरमध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विरोधकांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची आणि प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवण्याची जबाबदारी सायबर पँथर्सवर असल्याचे आतिश कांबळे म्हणाले. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाने केलेल्या कामांबद्दल सांगितले आणि आपल्या महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक महिन्याला करत असलेल्या लाखो किलोमीटरच्या दौऱ्यांची माहिती दिली. त्यांनी आयटी सेलच्या माध्यमातून या गोष्टींची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोशल मीडिया व आयटी सेलच्या या शिबिरात समाज कल्याण विभाग आणि एससी एसटी हबच्या अधिकाऱ्यांनी सायबर पँथर्स ना विविध रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रमुख सायबर पँथर्स यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराला माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, ईशान्य भारताचे प्रभारी विनोद निकाळजे, महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे, सुरेश दादा बारसिंग, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भाई कासारे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड, सुमित वजाळे इत्यादी नेत्यांनी संबोधित केले.
सूत्रसंचालन आयटी सेलचे सरचिटणीस सचिन कटारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयटी सेलचे संपर्कप्रमुख महादेव साळवे यांनी केले.
या वेळी मुंबई अध्यक्ष उमाजी सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सोनवणे, मुंबई सरचिटणीस किशोर कांबळे, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष रमेश पाईकराव, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश वानखेडे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, जळगाव जिल्हाध्यक्ष महेंद्र करणकाळे, नाशिक शहराध्यक्ष सागर सोनवणे, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल काटे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष विकास राऊत, बांद्रा तालुका अध्यक्ष संतोष बिरवटकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अंकुश हिवाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष मंगेश मोकळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *