- 29
- 1 minute read
२७वर्षाच राजकीयएकीकरण सामाजिकविलगिकरण
मातारमाई_आंबेडकर नगरातील #शहिदांना आणि त्यांच्या #समतावादी_शहादतीला विनम्र अभिवादन करत असतानाच,
आज 27 वर्ष पूर्ण झालेल्या या हत्याकांडाच्या निमित्ताने आणि या हत्याकांडाच्या नंतर #खैरलांजी #खर्डा #जवखेड #रोहितवेमुला #कोरेगावभीमा ते कालपरवापर्यंत च्या सगळ्या जातीयवादी हत्याकांड आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर,
आज #बौद्ध आणि #अनुसूचितजाती_जमातीच्या वर होत असलेले सामजिक बहिष्कार, हत्याकांड ते सामाजिक हल्ले आणि इतकं होऊन सुद्धा या अत्याचारित जाती जमातींच होत नसलेल #सामाजिकएकीकरण
आणि दुसरीकडे #हिंदुत्ववादी ते #फुर्रोगामी यांचं अनैसर्गिक पासून नैसर्गिकरित्या अतिशय सहज सोपं होत असलेल #राजकीयएकीकरण हा मुद्दा मला व्यक्तिशः आज प्रचंड अस्वस्थ करून जात आहे.
आज 27 वर्षात राज्यातील आणि केंद्रातील राजकीय राजकारण आणि त्याच ध्रुवीकरण 360 कोनात बदलून सुद्धा कायम अत्याचारित असलेला समाज आज एकत्र होताना दिसत नाहीये पण अत्याचार करणारे मात्र कोणत्याही राजकीय पक्ष संघटनेत असले तरी सहज एकत्र होतात याबद्दल नव्या पिढीने नीटपणे विचार करून यावर काम करण्याची गरज आहे असे मी समजतो.
बौद्ध आणि अनुसूचित जाती जमातीच्या वर होत असलेले हल्ले कोणतही सरकार आलं तरी थांबायला तयार नाहीत, आज बौद्धांचे राजकीय सामाजिक नेते त्यांनी कितीही भूमिका मांडल्या तरीही हे सगळं काही थांबायला तयार नाहीये.
Atrocity ची प्रकरणे आज काही मोजके नेते सोडले तर कोणीही यात केसेस लढायला तयार नाहीत. कारण ही प्रकरणे लढण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, केसेस, तारखा, वकील, साक्षीदार (त्याना इतक्या वर्षात सोबत ठेवण ) पैसा खर्च होन सुद्धा आलंच आणि हे सगळं करता करता मध्येच manage होणारे अत्याचारित कुटुंबे आणि मग या सगळ्यांवर फिरलेलं पाणी हे सगळं होऊन सुद्धा पुन्हा नव्याने एका नव्या Atrocity च्या मागे सगळी ताकद पणाला लावून एका एका कुटुंबासाठी इतकी मेहनत घेणे खायची गोष्ट नाहीये आणि ही मेहनत चिकाटी जिद्द आज राज्यात ज्या व्यक्तीत आहे ती व्यक्ती माझ्यासाठी कायम वंदनीय आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी 23 वर्ष मातारमाई आंबेडकर नगर हत्याकांड केस लावून धरली लढली आणि इतकच नाही तर #जवखेड #खर्डा आणि इतर सगळ्याच अट्रोसिटीच्या केसेस ज्यांनी अतिशय ताकदीने आणि चलाखीने पुढ आणल्यात अश्या आदरणीय #श्यामदादागायकवाड यांचा उल्लेख केल्याशिवाय आज पुढे जाताच येणार नाही. हे नव्या पिढीला सांगितले पाहिजे.
आमच्या ठाणे जिल्ह्यात क्वचितच Atrocity ची प्रकरणे झाली असतील त्याला कारण ते म्हणजे आमच्या ठाणे जिल्ह्यातील दोन सिंह एक म्हणजे दिवंगत नरेशदादा गायकवाड आणि दुसरे श्यामदादा गायकवाड ह्या दोघानी आणि त्यांच्या साथीदारांनी अक्षरशः जातिवाद्यांना सळो की पळो करून सोडलं होत आणि हा इतिहास अजिबात 40 वर्ष सुद्धा जुना नाहीये.
आज प्रकाश आंबेडकर असतील की बसपा किंवा बामसेफ वाले आमचे पक्ष संघटना असतील यांनी क्वचितच अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतलाय त्यांनी तो घ्यावा अस आमचं मत सुद्धा नाहीये. त्यांनी काय करावं हे आम्ही ठरवणारे कोणीच नाही आहोत पण एक गोष्ट नक्की आपण ध्यानात घेतली पाहिजे की, पक्ष संघटना म्हणून जरी आपण एक नसलो तरी #आंबेडकरवादी_बौद्ध म्हणून आपला हा #नैतिकदरारा आपण निर्माण करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
राज्यात आणि देशात जो दरारा आज ब्राह्मण मराठा शीख जैनांचा आहे तोच #आंबेडकरवादी_बौद्धांचा असायला हवा.
आणि तो नसल्यानेच आज #सामाजिक #आर्थिक #शैक्षणिक #सांस्कृतिक #अट्रोसिटीजला आज राज्यात आणि देशात उत आलाय.
मग तो विषय अन्याय अत्याचाराचा असो की शैक्षणिक निधी वळविण्याचा असो बौद्ध लेण्या पाडण्याचा असो किंवा साकेत मधील बौद्ध विहाराचा असो या सगळ्या अट्रोसिटी आज आपल्याच मुळावर येऊन बसल्यात.
आणि म्हणूनच,
शूरवीरांची अहिंसा आणि भेकडांची अहिंसा यात जमीन आस्मानाचा फरक असतो.
आपण सुद्धा शूर होऊन मगच अहिंसावादी होऊयात कारण शिकार बकऱ्या मेंढ्या आणि हरणांची होते वाघाची नाही.
समतावादी शूर पण अहिंसक असे आंबेडकरवादी बौद्ध म्हणून या सगळ्यांची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि नैतिक जबाबदारी स्वीकारूनच आपल्याला समतेच्या आणि समभागाच्या लढाईच्या दिशेने वाटचाल करायला हवी.
मग कितीही राजकीय एकीकरण होऊद्यात बघू सामाजिक विलगिकरण रोखण्याची कोणाची ताकद आहे ती…
तूर्तास इतकंच…
आपण या समतावादी लढ्यात शूर होऊन सर्वांना सोबत घेऊन या जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांचा पक्का बंदोबस्त करून भारत देशाला पुन्हा एकदा स्वतंत्र करावं इतकीच अपेक्षा करून आजवर देशासाठी आणि समाजासाठी बलिदान दिलेल्या सर्व शहिदांना आणि त्यांच्या शहादतीला मनापासून अभिवादन करतो आणि थांबतो.
– महेंद्र अशोक पंडागळे