भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भा.ज.प.ला देश आणि राज्यांतील अन्य छोटे पक्ष संपावेत असेच नेहमी वाटत आलंय. आजचा विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्याचा हा अजून एक अस्सल पुरावा आहे. एकेकाळी रायगडमधून शे.का.प.चा एक खासदार हमखास निवडून यायचा, आता मात्र विधानपरिषदेच्या अक्षरशः एका जागेकरिता शे.का.प.ला झुंजावं लागलंय. त्यातही दारुण पराभव झाला. खरे पाहता मिलिंद नार्वेकर शिवसेना(ठाकरे गट) यांच्या पेक्षा कित्येक जास्त पटीने शेकापच्या जयंत पाटलांनी म.वि.आघाढीचा एक घटक पक्ष म्हणून नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत म.वि.आ. आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला मदत करून आघाढीधर्माचे प्रामाणिक पणे नैतिक पालन केले.आणि तोच आघाढीधर्म म्हणून काँग्रेस,राष्ट्रवादी या आघाढीतिल घटक पक्षांना शे.का.प.च्या जयंत पाटलांना निवडून आणून शे.का.प.ने केलेल्या मदतीचा थोडेफार उतराई होण्याचा अल्पसा का होईना आघाढीधर्म त्यांना पाळता आला असता.पण ते होणे नव्हते.आघाढीधर्माचे पालन करणे हे कॉंग्रेसचे राजकीय चारित्र्य यापूर्वी कधीच राहिलेले नाहीय. विधानपरिषदेच्या या आधी झालेल्या निवडणुकीतही चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव,आणि त्याऐवजी भाई जगताप यांचा झालेल्या विजयाने काँग्रेसचे खरे राजकीय चारित्र्य यानिमित्ताने यापूर्वी अलाहिदा उघडे पडले आहे.आताही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) ने शे.का.प.च्या या मदतीचा फक्त स्व-स्वार्थासाठी पद्धतशीरपणे वापर करून घेतला आणि त्यानंतर गरज सरो अन वैद्य मरो या न्यायाने जयंत पाटलांना वाऱ्यावर सोडले.आता विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही.आंबेडकरी विचारांचे आमदार नाहीत.डाव्या समाजवादी चळवळीतले देखील आमदार नाहीत.या सर्वांनी आणि विशेषतः आंबेडकरी तसेच मुस्लिम समुदायाने संविधान आणि लोकशाही..?? वाचविण्यासाठी काँग्रेस एन.सी.पी. (श.प.गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना नुकत्याच पार पडलेल्या १८व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत निवडून दिले आणि स्वतःचा आत्मघात करून घेतला आहे.वंचित बहुजन आघाढीला बी टीम बोलणारे आता ना बी टीम आहेत ना सी टीम ते आता काँग्रेस आघाडीचा स्लीपर सेल झालेत….!!
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२४ करणी आणि कथनी यात जमीन-अस्मान तफावत असणारी भारतिय राष्ट्रीय काँग्रेस आणि तिच्या दावणीला बांधले गेलेले छोटे राजकीय पक्ष…