वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती तथा ‘युक्रांद’चे जेष्ठ नेते अरुण ठाकूर यांचे आज बुधवार दिनांक 17 जुलै रोजी उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गुरुवार 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुलुंड पश्चिम येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय आयटी उद्योगाच्या स्थापनेत अरुण ठाकूर यांचा सिंहाचा वाटा होता. IRCTC (रेल्वे आरक्षण साइट), BOLT (BSE ची बॉम्बे ऑनलाइन व्यवहार प्रणाली), पोर्ट्स आणि कॉर्गो संगणकीकरण आणि ऑटोमेशन करण्याची जबाबदारी त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून पार पाडली आहे. जगभरातील 35+ आंतरराष्ट्रीय बंदरे त्यांच्या नेतृत्वात संगणीकृत करण्यात आली आहेत. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना बंदर आणि मालवाहतूक संगणीकृत करण्याच्या डेमो अरुण ठाकूर यांनीच दिले होते.
समाजवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ठाकुर, मुलगी प्रा. डाॅ. सई ठाकूर, मुलगा सौरभ असा परिवार आहे.