आपल्या पश्चात आपले समाज उद्धाराचे कार्य बिघडू नये याचा प्रत्येक महापुरुष विचार करीत असतो. तथागत बुद्धांनी असा विचार केला होता आणि आपल्या पश्चात कोणीही वारस न नेमता आपल्या शिकवणीच्या काटेकोरपणे पालनास बांधलेल्या भिकूंचा संघ स्थापन केला होता आणि त्याला धम्माच्या पालनात कार्यरत राहण्याचा वारसा दिला होता. थोडक्यात त्यांनी आपल्या विचारांचा वारस चालविण्याची यंत्रणा उभी केली होती. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या पश्चात आपले कार्य कसे चालावे याचे नियोजन केले होते. त्यांना बौद्ध सेमिनरी स्थापन करून त्यामधून प्रशिक्षित भिकू आणि उपासक प्रचारकांची फौज निर्माण करायची होती. त्यांच्या हयातीत हे कार्य तडीस गेले नाही. त्यामुळे सर्व काही बिघडून गेले. त्यांच्यानंतर या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या नियोजनाची पूर्ती वाट लावली. सेमीनरीतून सक्षम कार्यकर्ता आणि नेते उदय पावले असते. त्यांच्या आचार विचारावर वचन करायला असता. योग्यायोग्यतेची परीक्षा झाली असती. समाज जागृत राहिला असता. त्याने खोटे नाते आणि लांडी लबाडी खपवून घेतली नसती. परंतु लायकी नसताना मोठेपण मिळविण्याची फालतू अशा बाळगणाऱ्यांना बाबासाहेबांचे हे लायकी सिद्ध करायला लावणारे नियोजन नको होते. म्हणून त्यांनी ते फेटाळून लावले आणि आपला स्वार्थ साधला. आज चांगल्यांची काही अशा बाळगायची असेल तर बाबासाहेबांच्या मूळ नियोजनालाच हात घातला पाहिजे. त्याशिवाय काही एक अत्यंत नाही. संघ चार प्रकारच्या लोकांचा बनलेला असतो. त्या चार प्रकारच्या लोकांना चार परिषदा म्हणून बौद्ध परंपरेत ओळखले जाते. त्या विनयाच्या नियमांनी बांधलेले असतात. भिकू परिषद, भिकुनी परिषद, उपासक परिषद आणि उपासिका परिषद. आणि या चारही परिषदांचा मिळून होतो तो संघ होय ! यांच्यातून जे स्त्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहंत अवस्था गाठतात त्यांचा होतो तो श्रावकसंघ होय. तो संघाचा सर्वश्रेष्ठ आदर्श असून त्यांचे संघ सरणं गच्छामी म्हणून वंदन केले जाते. व्यवहारिक पातळीवरील चार प्रकारच्या लोकांचा संघ जर सुसंघटित असेल तर तो काही चांगले करू शकतो. अशा प्रकारचा संघर्ष बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालू शकतो. बाकी सर्व कळत नकळत फक्त भ्रष्टाचार चालू शकतात. आज पर्यंत नेमके तेच घडत आलेले आहे. काही हल्ली लोक सेमिनरी स्थापना करण्याचा विचार करीत असताना दिसतात. उर्वरित भाग पोस्ट २ वरती पाहावा.
भदंन्त कीर्ती गुणसिरी. आंबेडकरी धम्मक्रांतीची नवी दिशा अभियान. प्रचारक बाळासाहेब ननावरे.