• 45
  • 1 minute read

एकाच जातीला फायदा कसा ?

एकाच जातीला फायदा कसा ?

एकाच जातीला फायदा कसा?

एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करावीशी वाटते ती ही की सर्वोच्च न्यायालयाच्या( दि.2 ऑगस्ट 2024) निकालानुसार/ निकाला नंतर, आरक्षणाचा लाभ एका विशिष्ट जातीने घेतला आहे अशी चर्चा सुरु झाली आहे खरे कारण त्यामुळे ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का बसला असून ते फारच अस्वस्थ झाले आहेत. हे असेच चालू राहिले तर त्यांचा ब्राम्हणी धर्माचं अस्थित्व धोक्यात येण्याच्या भितीने त्यांना घेरले आहे .

महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचीत जातींमध्ये/ जातींना 13%. सारखेच समान आरक्षण असताना, एकाच जातीला त्याचा कसा अधिक फायदा मिळाला?

(OBC घटकांमध्ये 27% मध्ये अमूक एक जातीला फायदा होत नाही, 27% मध्ये सर्व जाती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.)

त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही विशेष सवलत दिली का? आणि त्याचा इतर अनुसूचीत जातींना ती नाकारण्यात आली आहे का? हे पाहीले असता २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी पासून / अस्तीत्वात आल्या पासून असे कधीही 73 वर्षात काहीही झालेले नाही

हा संपूर्ण अनुसुचित जातीं मध्ये गैरसमज, संभ्रम,निर्माण करून, जाती-जातीं मध्ये एकमेकांबद्धल संशय,तेढ निर्माण करून, त्यांची सामाजिक चळवळ नष्ट करणे आणि त्यांच्या त्यांच्यात भांडणे लावून दुही निर्माण करणारी मनू -ब्राम्हणी विचार सरणी/अपप्रवृत्ती आहे.

परंतु त्यातील एका वास्तव्या कडे दुर्लक्ष करून, नजरेआड करून चालणार नाही कारण खोटी प्रथा / संकल्पना मांडण्याचाही मनू – ब्राम्हणी विचार सरणी प्रयत्न करीत आहेत.

वास्तव हे आहे की ज्यांनी फुले -शाहू आंबेडकरांची विचारधारा स्विकारली आहे, आत्मसात केली आहे त्यांनी मनू -ब्राम्हणी व्यवस्था नाकारली, ज्यांनी अमानवी धर्म व्यवस्था नाकारली ज्यांनी काल्पनीक देव, देवी,बुबा, बाबा नाकारले. त्यांची प्रगती झाली. तसेच ते आजही प्रगती पथावरून पुढे जाताना दिसत आहेत. आणि ही बाब मनू व्यवस्थेला खटकते आहे .

आरक्षण कशासाठी याचा उद्देश आपल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत (Preamble) स्पष्ट नमुद केला आहे. म्हणून संविधानातील आरक्षणासंबंधीचे अनुच्छेद (Article) आणि संविधानातील उद्देशिका (Preamble) एकत्र वाचल्यास आपल्या लक्षात येईल आणि हे समजून घेण्यासाठी ती वाचणे आणि भारतीय नागरीक या नात्याने (Citizenship of India) पठण करणे अत्यंत आवश्यक आहे .

संधीची समानता (Equal oportunity) आणि समानतेची संधी हा( Equality in opportunity) हा आरक्षणाचा मूळ उद्देश आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे आहे.

संधीची समानता ही व्यक्तीच्या सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधीत आहे.

आपल्या देशात जातीतील जन्मावरुन व्यक्तीची प्रतिष्ठा ठरविली जाते, त्यासाठी तो अधिकदृष्ट्या गरीब आहे की श्रीमंत आहे, हा प्रश्नच उद्‌भवत नाही. हा भेद नष्ट करण्यासाठी संविधान निर्मात्याने संधीच्या समानते बरोबरच दर्जाच्या समानतेची ग्वाही देशाला दिली. अनुसूचित जातीचा आरक्षणाच्या माध्यमातून थोडा बहुत अर्थिक विकास होईल, परंतु सामाजिक दर्जा व प्रतिष्ठा ही जाती व्यवस्था संपुष्टात आल्या शिवाय प्राप्त होणार नाही .

5 मे 2021 रोजी सर्वोच्य व्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या SEBC आरक्षण कायद्या संदर्भातील निकाल पत्रात जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेवर महत्वाचे भाष्य केलेले आहे.

“जातीवर आधारीत सामाजिक दर्जामधील भेद‌भाव नष्ट केला तरच सर्व जाती समान पातळीवर येतील आणि जाती विरहीत समाजाच्या पुनर्रचनेची ती सुरवात असेल.!”
S T Mirke

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *