• 46
  • 1 minute read

नगर पथविक्रेता समिती (Town Vending Committee) फेरीवाला प्रतींनिधी निवडण्याचा अधिकार सर्व फेरीवाल्यांना बहाल करा !

नगर पथविक्रेता समिती (Town Vending Committee) फेरीवाला प्रतींनिधी निवडण्याचा अधिकार सर्व फेरीवाल्यांना बहाल करा !

2014 च्या सर्व्हे तील सर्व 99435 तसेच पीएम स्वनिधी योजने अंतर्गत अर्ज केलेल्या सर्वांना मतदार यादीत समाविष्ट करा !

या मागण्या करिता जनवादी हॉकर्स सभेच्या वतीने मुंबईत सर्वत्र निदर्शने

 
फेरीवाला कायदा अंमलात न आणता फेरीवाल्यांवरील कारवाई वाढविली गेली आहे. या विरोधात आपण जनवादी हॉकर्स सभेच्या वतीने सक्रियतेने काम करीत अर्थात विधानसभेत देखील आणि रस्त्यावरील संघर्ष सुरू ठेवला आहे. 9 जुलै चा मागणी दिवस आणि 18 जुलै चा आझाद मैदान येथील संयुक्त मोर्चा, जनवादी हॉकर्स सभा आघाडीवर राहिली. याच आपल्या दबावामुळे महानगरपालिकेने नगर पथविक्रेता समिती (टाऊन वेंडिंग कमिटी) च्या संदर्भात जनसंपर्क अधिकारी द्वारा वृत्तपत्र निवेदन जारी केले आहे. परंतु मतदान मात्र सर्वसमावेशक ठेवलेले नाही. आपण संघटना म्हणून सर्व फेरीवाल्यांना त्यांचा प्रतींनिधी निवडण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी करीत आहोत. 
या मागणीला घेवून जनवादी हॉकर्स सभेच्या वतीने मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी खालील  विभागात सकाळच्या सत्रात 5 ठिकाणी निदर्शने करण्यात आली. *मालाड पश्चिम, दफ्तरी रोड मालाड पूर्व, गोरेगाव रेल्वे स्टेशन पूर्व, प्रेम नगर जोगेश्वरी पूर्व, महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे आंदोलन करण्यात आले. शेकडो फेरीवाल्यांनी महापालिकेच्या या फुट पाडणार्‍या धोरणाचा विरोध केला. 
मालाड पश्चिम येथे छबिनाथ यादव यांनी संचालन केले तर कॉ काइयलस भगत, कॉ कल्पनाथ भगत, कॉ राजेश आर्या, कॉ जमूना गुप्ता यांनी महापालिकेच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करीत लोकशाही अंतर्गत सर्व फेरीवाल्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा ही आपली मागणी जबरदस्त घोषणा व स्फूर्तिदायक भाषणांनी केली. 
दफ्तरी रोड मालाड पूर्व येथे कॉ जमूना गुप्ता कॉ कैलास भगत, कॉ राजेशा आर्या, कॉ कल्पनाथ भगत, कॉ दिनेश गुप्ता कॉ राधेश्याम गुप्ता कॉ. उमेश गुप्ता कॉ जोगेंद्र गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो फेरीवाल्यांनी  सर्व फेरीवाल्यांना मतदाना करण्याचा अधिकार देण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक कॉ शैलेन्द्र कांबळे यांनी सध्याचे सरकार लोकशाहीला मारण्याचे काम करीत आहे, फेरीवाल्यांचा कायद्यान्वये प्राप्त मतदानाचा हक्क हिरावून घेत आहे. 80 % फेरीवाल्यांना उपासमारीच्या खाईत लोटत आहे. या विरोधात जबरदस्त संघर्ष करण्याचे आवाहन करीत महापालिका प्रशासनाला इशारा दिला की सर्व फेरीवाल्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार न दिल्यास फेरीवाला चक्का जाम करेल. 
गोरेगाव पूर्व येथे जनवादी हॉकर्स सभेचे अध्यक्ष के नारायनण यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. कॉ हरीचरण चौव्हान, कॉ अनिस शेख, कॉ लल्लन यादव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन हरिचरण यांनी केले. के नारायणन यांनी प्रमुख मार्गदर्शन करीत महापालिकेच्या धोरणाच्या खरपूस समाचार घेत लाखो फेरीवाले कुटुंब उध्दवस्त करीत असलायचे सांगितले. एकाबाजूला पंतप्रधान कर्ज देत आहेत आणि त्याच फेरीवाल्यांना व्यवसाया करण्यास मज्जाव महापलिका करीत. असे दुटप्पी धोरण सरकार घेत आहे याविरोधता संघर्ष अधिक मजबूत करने आवश्यक आहे. 
प्रेम नगर जोगेश्वरी पूर्व येथे शाखा सचिव अन्थोनी ग्रॅब्रियल व के धनपाल यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे जनवादी हॉकर्स सभेचे अध्यक्ष के नारायनण यांच्या नेतृत्वात तसेच कॉ संगीता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जबर दस्त निदर्शने करण्यात आली. यात महिलांचा सहभागी सर्वाधिक होता. 
 
– शैलेन्द्र कांबळे
0Shares

Related post

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *