धुळ्यात बांधण्यात येणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंग उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार करत वकिलांचा एक दिवसाचा बंद घोषित*
धुळे दि.२३(यूबीजी विमर्श)
धुळ्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगमध्ये वकिलांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने होणाऱ्या धुळे जिल्हा न्यायालय नुतन इमारतीच्या बांधकामाच्या उदघाटन कार्यक्रमावर दि.२३/१०/२०२४ रोजी वकिलांनी लालफित लावून प्रशासनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय धुळे जिल्हा बार असोसिएशनने घेतला असून धुळे बार असोसिएशनचा कोणताही सभासद सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही. कार्यक्रम स्थळी वकील सदस्य उपस्थित आढळल्यास त्याचे सभासदत्व धुळे जिल्हा बार असोसिएशनमधून रद्दबातल करण्यात येईल असे आज रोजी झालेल्या वकिलांच्या तातडीच्या बैठकीत सर्वानुमते ठरले आहे.धुळे जिल्हा वकिल संघाच्या सदस्यांच्या मागण्या मान्य न केल्याने वकिलांनी सदर कार्यक्रमावर बहिष्कार केला असून दि.२३/१०/२०२४ रोजी लाल रंगाच्या फिती लावुन वकिलांच्या मागण्या प्रलंबित असताना कामाचा कार्यारंभ करणा-या प्रशासनाचा दि.२३/१०/२०२४ सकाळी १०:००वाजता धुळे जिल्हा न्यायालयाच्या मुख्य गेटवर जाहिर निषेध करण्यासाठी सर्व वकिल वर्ग उपस्थित राहतील अशी माहिती धुळे जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल बी. पाटील व पदाधिकारी यांचेकडुन देण्यात आलेली आहे.
धुळे जिल्हा वकील संघाच्या सातत्याने पाठपुरावा करून देखील धुळे जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून नुतन जिल्हा न्यायालयाचा इमारतीचा प्रस्तावित नकाशा देण्यात आलेला नाही नुतन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत वकिलांना अत्यल्प व तुटपुंजी बैठक व्यवस्था होणार असल्याची माहिती मिळाल्यावर धुळे जिल्हा वकिल संघाने दि. १३/०९/२०२४ रोजी जावक क.७५८/२४अन्वये निवेदन मा. ना. मुख्य न्यायमुर्ती साो. मुंबई उच्च न्यायालय यांचेसह इतर संबंधित मा. না न्यायमुर्ती व मा. ना. मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य यांचेसह संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना दिले. सदर मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई प्रलंबित असताना धुळे जिल्हा न्यायालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत घिसड-घाईने दि.२३/१०/२०२४ रोजी प्रस्तावित नविन धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केले जात आहे. त्यास धुळे जिल्हा वकिल संघाच्या कार्यकारी मंडळाने दि.२२/१०/२०२४ रोजी नविन न्यायालयाच्या इमारतीत वकिलांना पुरेशी जागा उपलब्ध केल्याची शाश्वत आश्वासन दिल्याखेरीज कामाचा कार्यारंभ करू नये असा ठराव पारित करून विनंती पत्र मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश साहे धुळे याच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग यांना केले आहे.
सदर महत्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने दि. २०/१०/२०२४ रोजी धुळे जिल्हा वकिल संघाची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. सदर बैठकीत शेकडोच्या संख्येने वकिल समासद उपस्थित होते. बैठक व्यवस्थेच्या वकिलांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे मागणी व पाठपुरावा करूनही, त्याकडे दुर्लक्ष करून नविन इमारतीचे काम घिसड-घाईने सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने सिनियर वकिल सदस्यांसह जुनियर वकिल सदस्यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. मागण्या मान्य न झाल्याने नविन इमारतीच्या बांधकामाच्या उद्घाटन कार्यक्रमास कोणत्याही वकिल सभासदाने सहभाग न नोंदविण्याचा तसेच दि.२३/१०/२०२४रोजी धुळे जिल्हा वकिल संघाचे सभासद वकिल बांधव कामकाज बंद ठेवण्याचा तसेच दि.२३/१०/२०२४ रोजी लाल रंगाच्या फिती लावुन वकिलांच्या मागण्या प्रलंबित असतांना कामाचा कार्यारंभ करणा-या प्रशासनाचा जाहिर निषेध करणार असल्याची माहिती धुळे जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल बी. पाटील व पदाधिकारी यांचेकडुन देण्यात आलेली आहे.