- 122
- 1 minute read
राजदशी युती करण्याची भीती दाखवून बार्गनिंग पॉवर वाढवित आहे चिराग पासवान….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 122
बिहारमध्ये तेजस्वी यादवला हरविण्याची ताकद मोदींमध्ये नाही !
भाजपकडे मतदार नाहीत, जनतेच्या विकासाचा कुठला ठोस कार्यक्रम नाही, जनतेसाठी आश्वासनाच्या नावाखाली केवळ जुमले आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. तरी ही भाजप सोबत युती म्हणजे हमखास जीत आहे, कारण भाजपकडे EVM मशीन आहे, हे सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना माहित असल्याने ते भाजपसोबत आहेत. शरद पवारांच्या समोर अजित पवारांची काहीच औकात नाही, पण राज्यात त्यांचे अधिक आमदार निवडून आले. एकनाथ शिंदे यांची ही उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत काहीच औकात नाही, पण आमदार अधिक आहेत. त्यामुळे राजकीय दलाली करून सत्तेची पद मिळविणारे पक्ष सातत्याने भाजपसोबत उभे राहताना दिसतात. बिहार निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारमधील मंत्री व लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती करून निवडणुका लढविण्याबाबत आज बोलत असले तरी ही युती काही होणार नाही. राजदबरोबर युती करण्याची भीती दाखवून आपली बार्गेनिंग पॉवर वाढविण्यासाठी ते हे वातावरण निर्माण करीत आहेत. दलित, महादलितांच्या मतांचे ठेकेदार बनलेले रामविलास पासवान यांनी जे राजकारण केले, तेच त्यांचे पुत्र चिराग पासवान व बंधू पशुपती कुमार पासवान करीत आहेत. अन जतीनराम मांझी ही तेच करीत आहेत. सत्ता फक्त भाजपसोबत गेल्यानेच मिळू शकते, असे वाटत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणणारे असे अनेकजण भाजपच्या वळचणीला उभे आहेत. महाराष्ट्रात ही कमी नाहीत.
निवडणूक आयोग प्रामाणिक असेल तर बिहार विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता असून या निवडणुकीला चार ते पाच महिने बाकी आहेत. पण देशासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले असताना देशाचे प्रचार मंत्री नरेंद्र मोदी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागले असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. चिराग पासवान व जतिनराम मांझी हे दोघे ही आज केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहेत. पण बिहार निवडणुकीत त्यांना सन्मानजनक जागा मिळतील की नाही ? याची खात्री वाटत नाही. त्यामुळे राजदबरोबर युती करण्याची धमकी ते भाजपला देत आहेत. या अगोदर ही अशा पद्धतीचे राजकारण या दलित नेत्यांनी केलेले आहे. बिहारच नाहीतर दलित मतांचे ठेकेदार असलेले अन्य राज्यातील दलित नेते ही या प्रकारचे राजकारण निवडणुकीच्या तोंडावर करून सौदेबाजी करताना दिसतात.
बिहार विधानसभेत बहुमत मिळवून आपला मुख्यमंत्री बनविण्याचा प्रयत्न भाजप गेली ३ टर्म करीत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २०१५ व २०२० मध्ये निवडणुका झाल्या, पण भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकले नाही. २०१५ मध्ये व २०२० मध्ये ही राजद अनुक्रमे ७५ व ८१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप व निवडणूक आयोगाची युती नसती तर २४३ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत एकट्या राजदनेच बहुमताच्या आकडा सहज गाठला असता. तर निवडणूक आयोगाशी व दलित मतांचे ठेकेदार असलेल्या पक्षांशी युती करून ही भाजपला २०१५ मध्ये केवळ ५३ जागा मिळाल्या. तर राजदबरोबर युती असल्याने नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडला ७१ जागा मिळाल्या होत्या. पण २०२० मध्ये नितीशकुमार भाजपच्या युतीत असल्याने त्यांना ४९ व भाजपला ७४ जागा मिळाल्या. या आकड्यावरून हे स्पष्ट होते की भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवून स्वतःची ताकद वाढवितो. महाराष्टात ही तीन दशकाच्या युतीच्या काळात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची ताकद कमी कमी होत गेली, तर भाजपची वाढत गेली. पण हे कळते तेव्हा सर्व संपलेले असते. बिहारमध्ये नितीश कुमार आज असेच संपले आहेत. त्यांना व त्यांच्या पक्षाला कुठलेच भविष्य राहिलेले नाही. किंबहुना पक्षाची सूत्र ही आता त्यांच्या हातात राहिलेली नाहीत. इतकी वाईट अवस्था मित्र पक्ष असताना नितीशकुमार यांची भाजपने केली आहे.
चिराग पासवानलाही भाजपने चांगलाच धडा शिकवलेला आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे तुकडे केले आहेत. तरी ही आज ते भाजपसोबत आहेत. कुठली ही लाजलज्जा नसलेले हे पक्ष व नेते आहेत. काहीही करून त्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळे ते राजदबरोबर जाणार नाहीत. फक्त भाजपला धमकी देण्यासाठी ते जाण्याचे नाटक करीत आहेत. आणि समजा त्यांनी तसा काही निर्णय घेतलाच तर त्याचा पक्ष पुन्हा तुटेल. त्यांचे खासदार ही त्यांच्यासोबत राहणार नाहीत. याची जाणीव व पूर्वानुभव ही त्यांना आहे. त्यामुळे असे काही होणार नाही. हिच अवस्था आता नितीशकुमार व मांझीची ही झालेली आहे. आंबेडकरी विचारांचा व चळवळीचा प्रभाव असलेल्या बिहार, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या राज्यातील दलितांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तर घेत आहेत. पण ते संविधान विरोधी संघ व भाजपसोबत आहेत.
खरं तर एखाद्या राज्याच्या निवडणुका त्या राज्याच्या असतात. तो पंतप्रधानांचा विषय नसतो. देशाच्या समस्या सोडविणे, देशाच्या विदेश नीतीची धोरणे आखणे, उद्योगधंदे वाढवून देशाला संपन्न करणे, महागाई आटोक्यात आणणे, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, महिला, दलित व कामगार वर्गाला संरक्षण देणे, देशात सामाजिक सलोखा निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या हित व विकासाठी धोरणे राबविणे, शेती मालाला हमी भाव व बाजारपेठा उपलब्ध करून देणे, लोकशाही व संविधानावरील लोकांचा विश्वास वाढेल असा प्रयत्न करणे, ही काम पंतप्रधानांची आहेत. पण हीच कामे सोडून बाकी सर्व कामे नरेंद्र मोदी २४_२४ तास राबून करीत आहेत. पहलगाम आतंकी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भले ही भारतीय सेनेला यश मिळाले आहे, पण यामध्ये पाकिस्तानने भारतीय सेनेचे ५ फायटर विमाने पाडली आहेत. त्यामध्ये असणारे सेनाधिकारी शहीद झाले आहेत. ही गोष्ट मोदीने लपवून ठेवली आहे. स्वतंत्र भारतात हे पहिल्यांदाच होत आहे.
तसे स्वतंत्र भारतात अनेक गोष्टी पहिल्यांदा होत आहेत. सर्जिकल स्ट्राईक करून आतंकी अड्डे सेनाधिकाऱ्यांनी उध्वस्त केले, पण सरकारी खर्चाने जाहिरात मोदींची होतेय. सिन्दुर यात्रा काढून भाजपचा प्रचार केला जात आहे. भारत सार्वभौम राष्ट्र आहे, पण निर्णय अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत. मोदी फक्त बिहारच्या निवडणुकीत दंग आहेत. हा पहलगाम आतंकी हल्ल्या ही मोदींनीच बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी घडवून आणलेला आहे. ही आता केवळ चर्चा राहिलेली नाहीतर वस्तुस्थिती म्हणून समोर येत आहे. हल्लेखोर आतंकी देशात लपून बसलेले आहेत. त्यांना शोधण्याच्या कुठल्याही योजना आखल्या जात नाहीत. पण बिहार निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान दौऱ्यावर दौरे करीत आहेत. बिहार निवडणुका हाच आज देशासमोरचा सर्वात जटिल प्रश्न आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे.
बिहार निवडणुकीनंतर देशाचे राजकारण बदलेल …
केंद्रातील मोदी सरकार हे अल्पमतातील सरकार आहे. बिहारचा निकाल अनुकूल आला नाहीतर केंद्रातील सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. हे मोदीला चांगलेच माहित आहे. त्यामुळे वाट्टेल ते करून निवडणुका जिंकण्याचे त्यांचे प्रयत्न राहतील. त्याशिवाय त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्यामुळे ते मित्र पक्षांशी जुळवून घेताना धमक्या ही देतील. मत विभाजनाचा फॉर्म्युला अधिक प्रभावशाली करण्यासाठी ओवेसींला स्पेस द्यायचे काम त्यांनी सुरू केले आहे. पण तरी ही राजदचे पारडे जडच आहे. तेजस्वी यादव यांचा करिश्मा काही केल्याने कमी होताना दिसत नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील राजद, काँग्रेस, डावे पक्षांच्या युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींची गोदी मिडिया करीत आहे. पण त्यात ही मोदीला यश येताना दिसत नाही. एकंदर मोदींनी काहीही केले तरी तेजस्वी यादव यांना हारविण्याची ताकद मोदींमध्ये नक्कीच नाही, हे स्पष्टपणे दिसत आहे.
पहलगाम आतंकी हल्ल्या व त्यानंतरच्या सर्व घटना, त्यांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिणाम या सर्व गोष्टी देशासाठी जमेच्या नाहीत. तरी ही त्याकडे लक्ष न देता बिहार निवडणुकच मोदींसाठी महत्त्वाची झाली आहे, कारण ती या देशाच्या पुढील राजकारणाची दिशा ठरविणारी आहे. अन् त्या राजकारणात भाजपला स्पेस नाही. हे संघ व भाजपला चांगलेच माहित असल्याने काहीही करून निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व संघ प्रयत्न करेल. त्यामुळे चिराग पासवान अथवा त्याच्या सारखे जे दलित नेते भाजपच्या वळचणीला आहेत, त्यांना भाजप सहजासहजी सोडणार नाही. त्यांची सुटका ही नाही. त्यांना मान, अपमान सहन करीत भाजपसोबतच राहवे लागणार आहे. त्यांनी सोडायचा प्रयत्न केल्यास ते एकटे पडतील, पक्ष फुटेल. केंद्रातील मंत्रीपदावर पाणी सोडावे लागेल. अन् इतका त्याग करण्याची त्यांची तयारी असणार नाही. त्यामुळे मोदी, संघ व भाजप शिवाय चिराग पासवानजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही.
………………….
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares