अंधश्रद्धेच्या विरोधात अंनिस कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज
छत्रपती संभाजीनगर : अंधश्रद्धेच्या विरोधात अंनिस कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंनिसच्या राज्य उपाध्यक्षा डॉ.रश्मी बोरीकर यांनी केले. शहिद डाॅ.नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंनिसची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष श्रीराम जाधव यांचा अध्यक्षतेखाली रविवारी घेण्यात आली, यावळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, सध्याची सामाजिक स्थिती परिवर्तनवाद्यांसाठी अत्यंत प्रतिकूल असली तरही विज्ञानवादी विचार सामान्यांपर्यंत पोचला पाहिजे. शहादा (जि.नंदुरबार) येथे दि.३०,३१मे आणि १जून असे तीन दिवस विस्तारित राज्य कार्यकारिणीत झालली चर्चा आणि ठरावाची विस्तृत माहिती राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी दिली. यावेळी डॉ. बोरीकर आणि शहाजी भोसले यांची राज्य कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल त्यांचा ह्र्दय सत्कार करण्यात आला. विविध शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केले. दादासाहेब शिंदे भास्कर बनसोडे यांनी प्रेरणा गीत गायले. अंनिस कार्यकर्ते दिवंगत व्ही. सी.भुयागळे यांच्यासह शहिदांना व विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी जिल्हा प्रधान सचिव प्रा.शिवाजी वाठोरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष डी.एन.जाधव यांनी केले तर आभार शहर शाखा कार्याध्यक्ष सीमा शिंदे यांनी मानले. बैठकीस डॉ.अजित खोजरे, प्रशांत कांबळे, मोहन भोमे, डॉ. लुम्बिनी देबाजे,विजय मालुसरे, नितीन बारगळ, आनंद कसबेकर आदींसह सिल्लोड, लासूर स्टेशन, जळगाव घाट,आदी शाखांतील कार्यकर्त्यांसह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.