• 138
  • 1 minute read

गाजा पट्टीतील नरसंहाराचा विरोध व निषेध करणाऱ्या समाजवादी व डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईभर धरपकड….!

गाजा पट्टीतील नरसंहाराचा विरोध व निषेध करणाऱ्या समाजवादी व डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईभर धरपकड….!

मेराज सिद्दिकी यांना कुर्ला, तर राहुल गायकवाड यांना बॅलार्ड पियर येथून अटक ....!

 अमेरिकेच्या पुढाकाराने साम्राज्यवादी राष्ट्रांनी मानवी जीवन नष्ट करणारी आपली घातक शस्त्रे विकण्यासाठी युद्धाच्या माध्यमातून जगभरात नरसंहार करणारी युद्ध मालिका सुरू केली आहे. या युद्धांमध्ये निरापराध, निहत्ये लोकांना मारले जात आहे. यामध्ये लहान मुले व महिलांचा आकडा मोठा आहे. गेल्या दोन वर्षांपासून इस्रायल पॅलेस्टाइनमधील अशाच हजारो निरापराध व निहत्ये लोकांचा नरसंहार करीत आहे. गाजा पट्टीतील जनतेच्या सर्व नागरी सुविधा, शाळा, रुग्णालये या घातक शस्त्रांचा वापर करून उध्वस्त केल्या आहेत. जे जिवंत आहेत, ते अन्न पाण्यावाचून मरत आहेत. इस्रायलच्या पाठी घातक हत्यारांचा सर्व साठा घेवून अमेरिका उभा आहे. जगभरातील व विशेष करून गाजापट्टीतील नरसंहाराचा विरोध करण्यासाठी आणि या संदर्भातील भुमिका भारत सरकारने स्पष्ट करावी यासाठी आज आझाद मैदानात डाव्या व समाजवादी पक्षांच्या वतीने आज निदर्शने करण्यात येणार होती. पण त्यास परवानगी नाकारली गेली व डाव्या व समाजवादी पार्टीच्या अनेक नेत्यांना अटक केली आहे. समाजवादी पार्टीचे मुंबई प्रदेश सचिव मेराज सिद्दिकी यांना कुर्ला, तर समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव राहुल गायकवाड यांना माता रमाबाई आंबेडकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
*.         गाजा पट्टीतील जनतेच्या नरसंहाराचा निषेध व भारताने सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी डाव्या व समाजवादी पक्षाने राष्ट्रीय पातळीवर निर्दशने करण्याचा कार्यक्रम १७ जून रोजी जाहीर केला होता. तर त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून डाव्या व समाजवादी पक्षांनी १८ जून रोजी आझाद मैदानात ही निर्दशने करण्याचे ठरविले होते. मात्र मुंबई पोलिसांनी त्यास परवानगी नाकारली. यासंदर्भात डीडीपी झोन १ चे उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे यांच्या बरोबर काल बैठक ही डाव्या व समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. निर्दशने शांततामय वातावरण करण्याचे आश्वासन ही दिले, तरी ही परवानगी नाकारण्यात आली.  तसेच काल मध्यरात्रीपासूनच डाव्या व समाजवादी पार्टीच्या नेत्यांची पूर्ण मुंबईभर धरपकड करून त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रितसर अटक केली नसली तरी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या पदाधिकाऱ्यांना सोडायचे नाही, असे स्पष्ट आदेश पोलिसांना आहेत. पोलिसांची ही कृती आणीबाणी सदृश्य असून त्याची आठवण आज आली.
        
           मेराज सिद्दिकी यांना कुर्ला, तर राहुल गायकवाड    यांना बॅलार्ड पियर येथून अटक ….!
 
          समाजवादी पार्टी मुंबई प्रदेश महासचिव मेराज सिद्दिकी यांना कुर्ला पोलिसांनी रात्री १ वाजताच ताब्यात घेतले असून महाराष्ट्र प्रदेश महासचिव राहुल गायकवाड यांना आज सकाळी बॅलार्ड पियर येथील प्रदेश कार्यालयातून ताब्यात घेतले. धारावीतून दक्षिण मध्य जिल्हा उपाध्यक्ष अश्फाक खान, बसपाचे श्यामलाल जैस्वार यांना ताब्यात घेतले आहे. पूर्ण मुंबईभर डाव्या व समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. चारूल जोशी,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शैलेंद्र कांबळे, सीपीएम माले( लिबरेशनचे) कॉ. गोहिल , शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे , AIPSO चे फिरोज मिटीबोरवाला, प्रा. सोनवणे व कॉ. विवेक मॅकन्टेरो आदींना मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
        आझाद मैदानात आंदोलने, निर्दशने व मोर्चे काढण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असताना पोलिसांनी या प्रकरणी परवानगी नाकारली असून, संबंधित सर्वांना १६८ च्या नोटीसा ही दिल्या आहेत. संविधात्मक व न्याय व्यवस्थेने दिलेल्या अधिकारांवर ही गदा आणण्याची महाराष्ट्र सरकार व पोलिसांची कृती आणीबाणीची आठवण करून देणारी असून या सदृश्य आणीबाणीचा समाजवादी पार्टी जाहीर निषेध करीत आहे.  युद्ध ही मानवी समाजासाठी घातक आहेत. युद्धाचा खेळ खेळणारी राष्ट्र नरभक्षक आहेत. ते नरसंहार करीत आहेत, या विरोधात आंदोलन करणारे राष्ट्रासाठी कसे काय घातक होऊ शकतात ? हा प्रश्न आज या निमित्ताने आम्ही देशातील सरकारला विचारत आहोत.
       आझाद मैदानात आज होणाऱ्या निर्देशनामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाला बाधा येण्याची शक्यता असल्याचे कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. देशातील केंद्र सरकारची विदेश निती इतकी कमजोर असेल तर पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या निवडणुकीतून थोडा वेळ काढून आपल्या सरकारच्या विदेश नितीकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी ही मागणी आता डावी व समाजवादी पक्षांची आघाडी करीत आहे.  तर निदर्शने करण्यास परवानगी नाकारून व या डाव्या व समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून सरकार हे युद्धखोरांचे समर्थक आहे. अमेरिकेच्या हातातील बाहुले आहे, हे सरकारनेच दाखवून दिले आहे. सरकारच्या या कृतीचा पुन्हा एकदा जाहीर निषेध….!!
 
     जयभीम…! जय संविधान…!! जय समाजवाद…!!!
 
…………. ..
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *