टाटा कंसल्टंसीने १२,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला; आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे आयटी किंवा तत्सम क्षेत्रात बेकारी येणार अशा बातम्या येऊ लागल्यावर ….. कामगार,कर्मचारी, तरुणांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर कोणकोणते कोर्स करावेत , म्हणजे तुम्हाला नवीन, पर्यायी नोकऱ्या मिळतील याचे सल्ले द्यायला ते नेहमीप्रमाणे सरसावले आहेत.
आयटी कंपन्यांच्या सी इ ओ ची शेकडो कोटींची वार्षिक पॅकेज, आयटी कंपन्यांनी हजारो कोटी रुपये संचित नफा वापरून केलेले बायबॅक याबद्दल एक चकार शब्द काढ्याचा नाही.
कामगार कायदे, शासन, खुद्द कोर्पोरेट्स यावर काहीही टीका करायची नाही.
ए आय मुळे येऊ घातलेली बेकारी हा काही सुटा प्रश्न नाहीये. तो शंभर पटींनी गंभीर बनतो कारण कारण गेली अनेक वर्षे संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मिती होऊ शकणारी आर्थिक धोरणे अमलात आणलेली नाहीत याबद्दल गप्प राहायचे
हा प्रश्न हजार पटींनी गंभीर बनणार आहे कारण भौतिक आकांक्षा वाढलेल्या , कर्ज काढून लाखो रुपये फिया भरून उच्च शिक्षण घेतलेल्या विशी तिशीतील तरुणांचे आपल्या देशातील प्रमाण एक तृतीयांश आहे यावर भाष्य करायचे नाही
_________
ही लोक नेहमीच अशी सरसावतात. पगारी फूट सोलजर सारखी
शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की त्यांना मानसिक शांतीचे धडे द्यायला, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डोस पाजायला ; पण शेतीतील अरिष्ट , हमीभाव , कर्जबाजारीपणा याबद्दल कधीही बोलत नाहीत
ग्रामीण भागात दुष्काळ / पाण्याचा प्रश्न आला की थातुर , मातुर प्रयोग करायला यांच्या एनजीओ येतात ; पण एकूणच पर्यावरणाच्या नाशामुळे निसर्गाचा वाढता लहरीपणा, बियर आणि शीतपेय कोर्पोरेट्स भूगर्भातील पाण्याचा, क्षुल्लक पैसे भरून कोट्यवधी लिटर्स उपसा करतात त्यावर ते बोलत नाहीत
सर्व्हिसेस किंवा आयआयटी स्पर्धा परीक्षामुळे अपयश येऊन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या, व्यसनाधीनता वाढली की अपयशाला कसे सामोरे जायचे याचे सल्ले द्यायला यांचे काउंसिलर्स सरसावतात
स्त्रियांना संसार चालवण्यासाठी कुटुंबियांचे पुरेसे उत्पन्न हातात येत नाही म्हटल्यावर … परतफेड करण्याची कुवत आहे किंवा नाही हे न पाहता …. भरपूर सूक्ष्म कर्जे देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या सरसावतात किंवा दुसऱ्या बाजूला तुम्ही भांडवल बाजारात तुमच्या बचती गुंतवल्यात तर काहीही काम न करता जास्त उत्पन्न मिळवू शकाल सांगत म्युच्युअल फंड / एएसएपी वाले सरसावतात
आरोग्य / वैद्यकीय खर्च परवडत नसणाऱ्यांना वैद्यकीय विमा काढायला सांगतात
बेरोजगारांना उद्योजक व्हा सांगून रोजगार मागणारे काय बनता, रोजगार देणारे व्हा म्हणून खिजवतात
मोठी यादी आहे या सरसावणाऱ्या लोकांची
या स्वतःला एन जी ओ म्हणवतात, प्रत्यक्षात त्या जी ओ (गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन) आहेत. सिस्टीम विरुद्धचा असंतोष सतत डिफ्लेक्ट करत राहण्यासाठी त्या सिस्टिमने जन्माला घातल्या आहेत. फक्त यांचे फंडिंग स्रोत शोधा सर्व काही समजेल.
संजीव चांदोरकर (११ ऑगस्ट २०२५)