• 48
  • 1 minute read

अमरावतीचे ‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ प्रकरण तापले

अमरावतीचे ‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ प्रकरण तापले

अमरावती : स्वातंत्र्य दिनी जालन्यात उपोषणकर्त्यांना पालकमंत्र्यांना भेटू न देता पोलीस उप अधीक्षकाने उडी घेत त्यांच्या कमरेत लाथ घातल्याचे छायाचित्र राज्यात एकीकडे गाजत आहे. तर दुसरीकडे अमरावती येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्या पत्नीने एका पत्रकार महिलेला थेट उपोषण स्थळी जावून धमकी दिल्याची घटना स्वातंत्र्य दिनीच घडली आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात गाजत असलेले माहिती अधिकाऱ्याचे ‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ चे प्रकरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणात उपोषणकर्त्या पत्रकार वंदना तळखंडे यांनी स्थानिक गाडगे नगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करत कोटुरवार आणि त्यांच्या पत्नीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘ माझ्या पतीच्या विरोधात सुरू केलेले उपोषण बंद कर. अन्यथा तुला बरबाद करुन टाकेन. आमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही ‘ अशी धमकी आपणांस कोतुरवार यांच्या पत्नीने दिली, असे वंदना तळखंडे यांनी सांगितले.

त्या अधिस्वीकृती धारक पत्रकार आहेत. विदर्भातील राज्य सरकारच्या जाहिरात पात्र वृत्तपत्रांच्या यादीत समाविष्ट असलेल्या आणि गेली १० वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या एका साप्ताहिकाची त्या संपादिका आहेत.

पत्रकार वंदना तळखंडे यांचे एक स्थानिक दैनिकही पाच वर्षांपासून अमरावती येथून प्रसिद्ध होत आहे. त्या वृत्तपत्राला राज्य सरकारच्या जाहिरातींसाठी पात्र ठरवण्याच्या बदल्यात शरीरसुख देण्यासाठी माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आपला पिच्छा पुरवला ,अशी त्यांची तक्रार आहे. या प्रकरणात कारवाईसाठी त्यांनी १४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये अमरावतीला रुजू झालेल्या त्या माहिती अधिकाऱ्याचे
‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ ( असभ्य प्रस्ताव) आपण धुडकावून लावले. त्याचा सूडही आपल्यावर त्यांनी उगवला आहे, असा स्पष्ट आरोप या पत्रकार महिलेने केला आहे. आपली अधिस्वीकृती पत्रिका ३ एप्रिल २०२५ रोजीच्या एका पत्राद्वारे कोटुरवार यांनी रद्द केली आहे, अशी माहिती तिने दिली आहे.
==============

आपली विनीत

( श्रीमती वंदना तळखंडे)
पत्रकार, अमरावती.
संपर्क मो :+91 75071 50805

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *