तुम्ही आरक्षण नको म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावर मोर्चा काढणारे तुम्हीच
एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर. तेथे बँ पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, “दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान कलमे वाचा व सुधारणा सुचवा; मग बाबासाहेब थोडयावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळयात पाणी भरून आलेले दिसले. तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय? तर देशमुख उत्तर देतात, “भिमराव, मी इथे ज्या मराठा कुणबी समाजाला आरक्षणाची तरतूद तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर तुम्ही सगळयांच्या अगोदर लिहून ठेवलंय.”
बाबासाहेब यांनी संवीधानाचा मसुदा तयार करुन संवीधान सभेत मांडला. प्रत्येक कलमावर चर्चा होत होती नतंर आरक्षणावर चर्चा चालू झाली SC, ST चे आरक्षण मिळवण्यासाठी बाबासाहेब यांना जास्त विरोध सहन करावा लागला नाही. पण जेव्हा OBC साठी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना भरपूर विरोधाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांनी OBC चे हक्क त्यांना मिळवून दिलेच.
बाबासाहेब यांनी मराठा समाजाला पण आरक्षण देण्याची तरतुद केली आणि मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आराखडा तयार केला. पण मराठयांचे आरक्षणाबाबत त्या वेळचे विचार काय होते ते कळले तर आज आश्चर्य वाटेल. कारण त्यावेळेस *हाच मराठा समाज भलामोठा मोर्चा घेऊन बाबासाहेब यांचा घरी गेला, आणि बाबासाहेबांना त्यांचे म्होरके म्हणाले, “आम्ही ९६ कुळी… आम्ही राजे…आम्ही गावचे पाटील… आम्ही भिकारडे वाटलो का? आम्हाला आरक्षणाची गरज नाही.”बाबासाहेबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, ‘तुम्ही आज गर्भश्रीमंत असलात तरी उद्या असणारच असे नाही. आज एका व्यक्तीकडे १०० एकर जमीन असली तरी ते उद्याचा काळात राहणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळात ती विभाजित होणार… नतंर त्यांच्या मुलात… नंतर त्यांच्या पुढच्या पिढीत, असं करता करता ती एकदिवस नाहीशी होणार, म्हणुन मराठा समाजाला आज जरी आरक्षणाची गरज नसली तरी ती उद्या गरज पडणार, आणि ते मिळवून देण्यासाठी मी नसणार.’ तरीही त्या मराठयांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही, म्हणून ती तरतूद वगळून कुणबी मराठा म्हणजेच obc ची तरतूद केली.आज मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मला बाबासाहेबांच्या त्या शब्दांची आठवण होते. प्रश्न असा निर्माण होतो की, आजतरी मराठा समाज बाबासाहेबांना समजून घेणार का???
संग्रहक – डॉ.तुरकुंडे(ओबीसी) संदर्भ : महामानव डॉ.भीमराव(बाबासाहेब) आंबेडकर