PinkyRikshaw पिंकी रिक्षावाल्या लक्ष्मीबाई सध्या मी ज्या वाहनातून प्रवास करत आहे ती पिंकी रिक्षा म्हणून नव्याने सुरू झालेला प्रकल्प आहे. महिलांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
ताडीवाला रोड अर्थात मातोश्री रमाबाई आंबेडकर वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या लक्ष्मीबाई या रिक्षा चालवत आहेत. यांना दोन मुली असून त्यांचा व कुटुंबीयांचा चरीतार्थ चालवण्यासाठी या रिक्षा चालवत आहेत. सकाळी लवकर उठून त्या धुन्या भांड्याची काम करतात , त्यानंतर मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवणे व त्यानंतर रिक्षा चालवत असतात. पिंकी रिक्षा चालवणाऱ्या त्या एक मात्र महिला आहेत.
रिक्षाला मिटर यावा अशी त्यांची मागणा आहे.
कष्टाला पर्याय नाही कुटुंबासाठी कष्ट करायला हवेत नवीन नवीन मार्ग निवडायला हवेत यापूर्वी जे आपण केले नाही ते आता करायला हवं या विचाराने त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली होती . त्यांच्यासमोर काही अडचणी देखील आहेत , वस्तीत राहत असल्यामुळे रिक्षाची सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे. खाजगी जागेवर लावून त्यासाठी चार्जिंग व रिक्षा लावण्याचे भाडे म्हणून दररोज शंभर रुपये त्यांना द्यावे लागतात. सध्या त्यांचा रिक्षाचा व्यवसाय हा पाचशे सहाशे रुपये असून त्यातले शंभर रुपये त्यांना चार्जिंग साठी जातात.
असो मला तर रिक्षा आवडली महिला एम्पॉवरमेंट साठी जे शक्य आहे ते आपण करायला हवे.