महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका

       अकोला  : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.

“महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कमिशन कमी होऊ नये, म्हणूनच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.” अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते म्हणाले की, “ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना खावटी मिळेल आणि सर्वेक्षण झाल्यानंतर संपूर्ण मोबदला देखील मिळतो. मात्र सरकार जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे. पाऊस ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, त्यामुळे आत्ताच तो जाहीर करणे आवश्यक आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ का जाहीर केला नाही? याचा खुलासा त्यांनी करावा.”

याचबरोबर मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितले, “जात, धर्म पाहून मतदान करू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना आता मतदारांनीच धडा शिकवला पाहिजे.”

0Shares

Related post

अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी होत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय ? चिंता व चर्चा करायची तर यावर झाली पाहिजे…..!

अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी होत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय ? चिंता व चर्चा करायची तर यावर…

कायद्याच्या राज्याची भाषा करणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आज गुन्हा ठरत असला तरी देशहितासाठी तो केलाच पाहिजे….!…
राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *