ब्राम्हण / वरिष्ठ जातीतला असेल तर तो जन्मतःच हुशार पुरुष स्त्रियांपेक्षा हुशार शहरातील माणसे ग्रामीण भागापेक्षा हुशार सुटेड बुटेड , साधे कपडे घातलेल्यापेक्षा हुशार फाडफाड इंग्रजी येणारा , मराठी किंवा प्रांतीय भाषा येणाऱ्यांपेक्षा हुशार प्रमाण भाषा बोलणारा बोली भाषेत बोलणाऱ्यापेक्षा हुशार सतत इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणारा ती गॅजेट गरजेपुरती वापरणाऱ्यापेक्षा हुशार आणि वयाने मोठे असणारे आपसूक तरुणांपॆक्षा हुशार / शहाणे सर्व काही काळ्या पांढऱ्यात
उजव्या बाजूच्या यादीतील लोकांनी मग डाव्या बाजूच्या यादीतील लोकांना भाव द्यावा , नतमस्तक व्हावे असे अलिखित सामाजिक नॉर्म
तरुण पिढी (आधी मनात काही काळ , नंतर तोंडासमोर) बरोबर म्हणते …. माय फूट ! ( म्हणून मला तरुण पिढी आवडते)
नुसते इतिहासात डोकावले तरी कळेल , प्रत्येक काळातील, प्रत्येक प्रदेशातील तरुण पिढीने सर्व प्रस्थापित नॉर्म झुगारले म्हणून मानवी समाजाची प्रगती झाली आहे. फक्त भौतिक अर्थाने नव्हे तर सर्व अर्थानी
हे आधीचे झुगारून देणे तरुणांच्या डीएनए मध्ये लिहिलेले असते. तरुणांनी आपला डीएनए ओळखला पाहिजे. खूप काही घडू शकते