ओबीसी मराठा संघार्षावरील ग्रंथाचे प्रकाशन न्यायमूर्ती निरगुडेंच्या हस्ते मुंबईत होणार

ओबीसी मराठा संघार्षावरील ग्रंथाचे प्रकाशन न्यायमूर्ती निरगुडेंच्या हस्ते मुंबईत होणार

ओबीसी मराठा संघार्षावरील ग्रंथाचे प्रकाशन न्यायमूर्ती निरगुडेंच्या हस्ते मुंबईत होणार

मुंबईः मंडल आयोगप्रणित आरक्षण हे ओबीसींच्या विकासासाठी आहे. परंतू ओबीसी जातींचा विकास झाला तर आपल्या सत्तेला तडे जातील असा न्युनगंड मनात बाळगणार्‍या उच्च जाती सत्तेचा गैरवापर करून ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या जातीसंघर्षामुळे आज संविधान व लोकशाही धोक्यात आलेली आहे. या जाती-संघर्षाला जातीअंताकडे कसे नेता येईल याचे मार्गदर्शन करणारा *‘‘ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षः जातीअंताचे क्रांतीकारी पर्व’’* हा ग्रंथ सुनिल खोब्रागडे व प्रा. श्रावण देवरे यांनी लिहीला असून *या ग्रंथाचे प्रकाशन 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात होत आहे.* मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष माननीय *आनंद निरगुडे* यांची प्रमुख उपस्थिती या समारंभात आहे, अशी माहिती ओबीसी सेवा संघ, ओबीसी राजकीय आघाडी व माळी विकास मिशन यांनी संयुक्तपणे काढलेल्या पत्रकात दिलेली आहे.
 
या ग्रंथाबद्दल अधिक माहीती देतांना पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मुंबईतील जरांगेंच्या बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली येउन 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा जातीचे सरसकट कुणबीकरण करणारा जी.आर. काढला असून हा जी.आर. जात बदलण्याची परवानगी देतो. भारतात जोपर्यंत जातीव्यवस्था जीवंत आहे, तोपर्यंत कोणालाही जात बदलता येत नाही. हिंसक मार्गाने जातीव्यवस्था निर्माण करणारे *धर्मशास्त्र* व लोकशाही मार्गाने जातीव्यवस्था नष्ट करणारे *संविधान* हे दोघेही जात बदलण्याची परवानगी देत नाहीत. *जात नष्ट होऊ शकते परंतू जात बदलता येत नाही.* आरक्षणासाठी जात बदलणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण सिद्धांत नष्ट करणे होय! *हा जी.आर. केवळ ओबीसींचेच आरक्षण नष्ट करेल, असे नव्हे तर दलित-आदिवासींचेही आरक्षण नष्ट करणार आहे.* त्यामुळे हा असंविधानिक जी.आर. त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी भुमिका या ग्रंथात मांडलेली आहे.
 
या ग्रंथाच्या पहिल्या भागात *‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जातींना आरक्षण का नाकारले’* याचे ऐतिहासिक विश्लेशन केलेले आहे. ग्रंथाच्या दुसर्‍या भागात  *‘कुणबी व मराठा या दोन भिन्न जातीतील संघर्षाचा इतिहास’* संदर्भ व पुरावे देऊन सिद्ध केलेला आहे. तिसर्‍या भागात *‘जात बदलून देणारा जी.आर. संविधानविरोधी आहे,* हे सिद्ध केलेले असून न्यायालयीन युक्तीवादासाठी ठोस मुद्दे दिलेले आहेत.
 
ग्रंथ प्रकाशन समारंभात एड. प्रदिप ढोबळे, लता प्र.म., कल्याण दळे, राम वाडीभस्मे व एड. अरविंद निरगुडे हे *प्रमुख पाहुणे* उपस्थित राहणार आहेत. तसेच उपोषणकर्ते ओबीसी योद्धे प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे, रविन्द्र टोंगे, भरत निचिते, रामभाऊ पेरकर, प्रा. विठ्ठल तळेकर, प्रल्हाद किर्तने व एड. मंगेश ससाणे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
 
सदरहू प्रकाशन समारंभ आझाद मैदानावरील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात 27 डिसेंबर, शनिवार रोजी संध्याकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास ओबीसी व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती संयोजकांनी केलेली आहे.   
 
0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *