विचारांना मारता येत नाहीं,म्हणून माणसं मारण्याची तूमची कूसंस्कृती,
अविचारांना,विचारांनी बदलवण्याची आमची संस्कृती.
तुमच्या तथाकथित श्रद्धेच्या जागी, रस्त्यावर,हायवेवर, गाभाऱ्यात,जागोजागी निर्लज्ज पणे बलात्कार करणारी तूमची कूसंस्कृती,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर इज्जत राखणारी आमची संस्कृती.
प्रश्न विचारणाऱ्यांच्या तोंडावर गोळ्या घालणारी तूमची कूसंस्कृती,
प्रश्नांमधून माणूस घडवणारी आमची संस्कृती.
शब्दांना देशद्रोह ठरवून फासावर टांगणारी तूमची कूसंस्कृती,
शब्दांनाच शस्त्र बनवून लढणारी आमची संस्कृती.
स्त्रीला देव्हाऱ्यात ठेवून रस्त्यावर ओरबाडणारी तूमची कूसंस्कृती,
स्त्रीला माणूस म्हणून जगू देणारी आमची संस्कृती.
भीतीच्या जोरावर एकमत उभं करणारी तूमची कूसंस्कृती,*विवेकाच्या बळावर मतभेद पेलणारी आमची संस्कृती.
इतिहास रक्ताने पुसून खोटं वैभव मिरवणारी तूमची कूसंस्कृती,
इतिहासातून शहाणपण उचलणारी आमची संस्कृती.
दगड, काठी, तलवारीत देव शोधणारी तूमची कूसंस्कृती,
माणसात माणूस शोधणारी आमची संस्कृती.
संविधानाला पायाखाली तुडवणारी तूमची कूसंस्कृती,
संविधानालाच श्वास मानणारी आमची संस्कृती.
मारून, जाळून, गाडून शांतता हवी असलेली तूमची कूसंस्कृती,
बोलून, लढून, बदल घडवणारी आमची संस्कृती
आता गप्प बसणार नाही अशी भूमिका घेणारी आमची संस्कृती,
भीतीला नकार देऊन उभं राहणारी आमची संस्कृती.
शाळा, रस्ते, विहार, वस्ती-वस्ती विवेक पेरणारी आमची संस्कृती,
संघटित होऊन अन्यायाच्या मुळावर वार करणारी आमची संस्कृती.
लक्षात ठेवा,
तुमची कूसंस्कृती माणसं संपवते,
आमची संस्कृती माणूस घडवते. हि घडलेली माणसें जेव्हा तुम्हाला भीडतील,
तुमच्या सत्तेकडे जाणाऱ्या सर्व शीड्या तोडतील,
अजूनही वेळ देतोय आम्ही तुम्हाला,
माणसांसारखे जगा व आम्हाला हीनाहीतर
तुमच्या कूसंस्कृतीला,
बोलालतेव्हा,बोलाल तिथे भीडून,
नाईलाजाने,
पुन्हा “भीमा कोरेगावचं पाणी” पाजायला तयार आहे आमची संस्कृती,”पुन्हा “भीमा कोरेगावचं पाणी” पाजायला तयार आहे आमची संस्कृती,”
कांबळेसर