अपघातग्रस्त विमानाचा इतिहास चांगला नसताना ते सेवेत राहिले आणि आजची दुर्घटना घडली
अपघात ग्रस्त learjet विमानाची ऑपरेटर असलेली
VSR VENTURES कंपनीचे हे विमान 2006 साली बनवलेले. म्हणजे आज रोजी जुने कबाडा झालेले म्हणावे असे. तरीही VVIP ड्यूटी वर लावत राहिलेले.
दिल्लीच्या महिपालपुर भागात या कंपनीचे ऑफिस असून विमानाचा मालक कॅप्टन रोहित सिंह आहे.
हेच विमान 14सप्टेंबर 2023 म्हणजे साधारण दोन वर्षापूर्वी आपल्याच राज्यात मुंबई विमानतळावर दुर्घटना ग्रस्त झालेले होते. त्यावेळी पण यात 6 लोकं ऑन बोर्ड होते. त्यावेळी पायलट गंभीर जखमी झालेले.
विशाखापट्टणम वरून मुंबईकडे उड्डाण भरून मुंबईला लॅन्ड होताना हा अपघात झालेला. त्याच्या अपघात बाबतच्या अहवालात टाईप ऑफ ऑपरेशन मध्ये नॉन शेडूल्ड उडान नमूद आहे. म्हणजे बेजबाबदारपणे हे विमान लॅन्ड करण्यात आलेले. असा याचा अर्थ होतो.
हा अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार यांच्या एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा आहे.
साधारण वीस वर्षे जुने असलेले त्यातही यापूर्वी अपघात ग्रस्त झालेले, अपघाताचे रेकॉर्ड असलेले हे विमान VVIP लोकांच्या प्रवासकरिता खरेतर कामावर असायला नको होते. आपल्या देशात अजूनही मानवी सुरक्षेला अतीव प्राधान्य नाही हेच यातून अधोरेखित होतेय.