• 72
  • 1 minute read

आदिवासी: प्राचीनत्व आणि प्रगती

आदिवासी: प्राचीनत्व आणि प्रगती

एखाद्या समाजाच्या अनुषंगाने आपण जेव्हा प्रगती या अवस्थेचा विचार करते तेव्हा त्या अवस्थेची खूप कारण सांगता येतात. या अवस्थेची वेगवेगळ्या अंगाने चिकित्साही पण करता येते. जेव्हा एखादा समाज प्रगत किंवा अप्रगत आहे असे आपण म्हणतो तेव्हासुद्धा आपणास दोन्ही अवस्थेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येते.

या बॅकड्रॉपवर आपण आज आदिवासी समाजाची प्रगती आणि त्यासंबंधीचे तथ्य आणि तर्क इथे बघू या. आदिवासी समाज आज फार मोठ्यात भ्रमात जीवन जगत आहे. आदिवासी माणूस म्हणतो की मी दुर्गम जंगलात राहत आहे, मी अप्रगत आहे, मी अर्धनग्न आहे याचाच अर्थ मी अतिप्राचीन आहे. या भूमीचा मूलनिवासी आहे. ही विधानं किती हास्यास्पद आहेत. हे तर असेच झाले की एखादा माणूस नंगा राहतो आणि म्हणतो मी आदिमानव आहे.

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती एवढी झाली की हरेक गोष्ट आता आपणास तपासून पहाता येते, त्यातील सत्य असत्य शोधता येते. याच संशोधनापैकी डीएनए हे एक संशोधन पद्धती आहे. या संशोधन पद्धतीनुसार जगातील सर्वच समाज हे सुरवातील रानटी अवस्थेत होते. मागास होते. गुफेत राहत होते, शिकार करून खात होते. सतत भटकत होते. या अवस्थेतला इंग्रजीत हंटिंग अण्ड गॅदरींग अवस्था म्हणतात.

या अवस्थेतून ब्राह्मण,ओबीसी, मराठा इतर उच्च समाज, आणि शूद्रातिशूद्र असे सर्व समाज गेलेत. हे सगळे समाज सुटा, बुट आणि टाय घालून जन्माला आले नाहीत. हे देखील रानटी अवस्थेत होते. या समाज समूहांनी निसर्गाशी स्पर्धा केली, आपल्या बुद्धीचा विकास केला, शेतीचे नवेनवे प्रयोग केले,शत्रूशी संघर्ष केला आणि त्यातून ते प्रगत झाले.आदिवासी असे का करू शकला नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आदिवासी माणूस आजही भ्रमात जगत आहे.निरक्षर आदिवासी माणसापेक्षा शिकलेला आदिवासी माणूस फार मोठ्या भ्रमात जगत आहे. तो उठता बसता बरळत राहतो की मी या भूमीचा मालक आहे.मी आदिम आहे.राजकीय लोक पण आदिवासींच्या या मूर्खपणाला खतपाणी घालत राहतात. ते पण मताच्या राजकारणासाठी आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत अशा वल्गाना करत असतात.

आदिवासींना खरेच प्रगती करायची असेल तर त्यांनी त्यांच्या अंगी असलेला ऐतिहासिक आळस( Historical laziness) टाकला पाहिजे. शिक्षणावर जास्त जोर दिला पाहिजे.जगाशी स्पर्धा केली पाहिजे.दगड धोंड्यांना आणि झडझुडपांना शरण जाणारे जुने विचार सोडून नव्या आधुनिक विचारांची कास आदिवासींनी धरली पाहिजे. विशेषतः उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघितले पाहिजे. डू आर डाय प्रयत्न करून मी माझी परिस्थिती बदललेल ही जिद्द तरूणांनी ठेवली पाहिजे. हे काम शिकलेले आदिवासी चांगले करू शकतात. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून हा लेखप्रपंच! धन्यवाद…!

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *