आदिवासी मुलीचे किंवा स्त्रीचे बाहेरील जातीच्या पुरूषाने लैंगिक शोषण केले असेल तर संथाल या आदिवासी जमातीत बितलाह घडवून आणण्याची एक प्रथा होती.
बितलाह समारंभाद्वारे गुन्हेगारला धडा शिकवण्यासाठी हा प्रकार संथाल घडवून आणतात. समजा एखाद्या मुसलमान पुरूषाने संथाल मुलीचे लैंगिक शोषण केले तर १० ते २० हजार संथाल त्या पुरूषाच्या घरी जातात. त्याच्या अंगणात पानाचा द्रोण ठेवून त्यात जळके लाकूड ठेवातात. त्याच्या दरवाजाला डुकराचा पाय बांधातात.
आणि नंतर सर्व संथाल त्या अपराधी पुरूषाच्या घरात,अंगणात आणि त्या परिसरात मुतून आणि हागून ठेवातात. यालाच संथाल आदिवासी बितलाह समारंभ म्हणत होते. समजा हिंदू माणसाने संथाल मुलीचे शोषण केले तर त्याच्या घराच्या दरवाजावर ते गायीचा पाय बांधत होते. बाकी विधी सारखीच.
आदिवासींमध्ये अशा अनेक प्रथा आहेत. आजसुद्धा ! ह्या प्रथा आदिवासींना जीव की प्राण वाटतात. एक साधा विचार आहे. तुमच्या डोक्यात नवा विचार येऊ द्यायचा असेल तर तुम्हाला जुने विचार सोडावे लागतील. आदिवासी माणूस अजून या नव्या संक्रमणासाठी तयार झालेला नाही. मग त्याची प्रगती तरी कशी होईल ?