• 34
  • 1 minute read

CLEAN OR CHEAT ? क्लिनचीट मिळालेल्या, मिळण्याच्या मार्गावर असलेल्या नेत्यांची यादी

CLEAN OR CHEAT ? क्लिनचीट मिळालेल्या, मिळण्याच्या मार्गावर असलेल्या नेत्यांची यादी

♦️नारायण राणे –
2016 मध्ये 300 कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केल्याचा, जमिन घोटाळ्याचा राणेंवर ईडीने आरोप ठेवला होता. मात्र, 2017मध्ये राणेंनी काँग्रेस सोडली. त्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर राणे भाजपमध्ये आल्यावर हे सगळे आरोप आणि त्याबद्दलचा तपासही हवेत विरला.

♦️अजित पवार –
सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याचे आरोप भाजपने केले. फडणविसांसोबत पहाटेच्या शपथविधीनंतर लगेच अँटीकरप्शन कडून क्लिन चीट देण्यात आली. बंड करत पुन्हा सरकारमध्ये सहभागी होताच शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणही क्लोजर रिपोर्टच्या माध्यमातून क्लोज करन्यात आलं.

♦️प्रफुल्ल पटेल –
नागरी उड्डाण मंत्री असताना विमान भाडेकरारात घोटाळ्याबाबत २०१७ पासून त्यांची चौकशी सुरु होती. पण दादांसह ते भाजप सरकारमध्ये सहभागी होताच अवघ्या ८ महिन्यात त्यांना क्लिन चीट देण्यात आली.सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर करत प्रकरण क्लोज केलं.

♦️छगन भुजबळ –
छगन भुजबळ, समीर, पंकज भुजबळ यांची 100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. भुजबळ दादांसह भाजप सोबत आल्यानंतर मंत्री झाले आणि काही महिन्यातच या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आणि प्रकरण बंद झालं.

♦️हसन मुश्रीफ –
जावयासोबत मिळून १०० कोटींचा, आणि दुसरा १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर ईडीने मुश्रीफांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. घर आणि कार्यालयात ईडीने छापेमारी केली. मुश्रीफांना चौकशीलाही सामोरं जावं लागलं. अटकेची शक्यता असताना तेही दादांच्या साथीने भाजपसोबत आले आणि कारवाई थंडावली.

♦️नवाब मलिक –
भाजप नेत्यांनी देशद्रोहाचे आरोप केले. अटक झाली. त्यानंतर तुरुंगात असतानाच दादांना पाठिंबा देणार अशा चर्चा सुरु झाल्यानंतर लगेच ईडीने कोर्टात घुमजाव केलं आणि मलिकांना जामिन मिळाला.

♦️बाबा सिद्दीकी- 2018 मध्ये बाबा सिद्दीकीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर ed ने छापेमारी केली. नंतर इडी ने 462 कोटींची सम्पत्ती जप्त केली. तेच बाबा सिद्दीकी आता दादासोबत पर्यायाने सरकारमध्ये आलेयत. ईडीच्या भीतीने नाही तर विकासाने भारावून.

♦️रविंद्र वायकर –
जोगेश्वरी कथित भुखंड घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले. आता ईडीच्या भितीने वायकर शिंदे गटात गेल्याची चर्चा. लगेच त्यांना दिलासाही मिळायला सुरुवात झाली.

♦️खा.भावना गवळी-
भावनाताईंवर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या ५ संस्थांवर ईडीच्या धाडीही पडल्या. त्यानंतर गवळींनी शिंदेंसोबत बंड केलं आणि नंतर तपास थंडावला.

♦️प्रतापराव सरनाईक –
टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार मनी लाँड्रिंग प्रकरणी सरनाईकांवर सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. १७५ कोटींच्या फसवणूकीचं प्रकरण होतं. अर्थात आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास बंद करावा अशी मागणी करणारा अहवाल सादर केला होता. त्यामुळे न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला.

♦️यामिनी/यशवंत जाधव –
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयटीने यशवंत जाधव यांना नोटीस बजावत घरावर रेड मारली होती. यशवंत जाधव कुटुंबाने हवालाच्या माध्यमातून युएई येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आऱोप. शिंदेंसोबत गेल्यानंतर चौकशी थंडावली.

♦️मोहित कंबोज –
बँकेची १०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पण सीबीआयने या प्रकरणाबद्दल क्लीन चीट देत क्लोजर रिपोर्ट सादर करत प्रकरण दाबलं. शेवटी कंबोज यांच्या कंपनीविरोधात पुरावे आहे असं म्हणत न्यायालयानेच क्लोजर रिपोर्टला केराची टोपली दाखवली.

♦️एकनाथ खडसे-
भाजपमध्ये असताना २०१८ साली भोसरी एमआयडीसी भुखंड घोटाळ्यात अँटी करप्शन ब्युरोने क्लिन चीट दिली. त्यांचं मंत्रिपद तेवढं काढून घेतलं.

♦️प्रवीण दरेकर-
मुंबै बँकेच्या पदाचा दुरुपयोग आणि बनावट कागदपत्रांद्वारे 123 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता. या प्रकरणात दरेकरांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चीट दिलीये.

♦️प्रसाद लाड –
मुंबई महापालिकेच्या कंत्राटात फसवणूक केल्याच्या २०१४ मधील प्रकरणात २०२२ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिन चिट

♦️तत्कालीन काँग्रेस नेते हेमंत बिस्वा सर्मा-
भाजपने पाणी पुरवठा योजनेत घोटाळ्याचा आरोप केला होता. नंतर ते भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री झाले. ईडीने पुढचा तपासच केला नाही.

♦️शिवराजसिंह चौहान-
ज्या व्यापम घोटाळ्यात ४० साक्षीदारांचा मृत्यू झाला त्या प्रकरणात भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांना सीबीआयकडून क्लीन चीट देण्यात आली.

♦️रेड्डी बंधू-
१६५०० कोटींच्या खान घोटाळ्यात भाजपमध्ये असलेल्या रेड्डी बंधुंना २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी सीबीआय ने क्लिन चीट दिली.

♦️सुवेन्दू अधिकारी- 2017 मध्ये भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. आता तेच 2020 साली भाजपमध्ये आल्यामुळे आरोप तपास हवेत विरला.

– सौरभ कोरटकर

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *