ll प्रासंगिक ll

ll प्रासंगिक ll

मित्रहो !

निर्ऋती ही सिंधू संस्कृतीतील आद्य गणमाता व बहुजनांची आद्य राष्ट्रीदेवी. वैदिक छावणीने तिचे ‘नरकाची देवता’ असे दुष्ट नेणीवीकरण केले. निर्ऋतिला या बदनामीतून मुक्त करण्यासाठी थोर प्राच्यविदृयापंडित कॉम्रेड शरद् पाटील यांनी सुप्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित एम्. ए. मेहंदळे यांच्याशी १९८२-८३ साली वादविवाद केला. दोन महापंडितांमधील हा वादविवाद त्याकाळी गाजला.

कॉम्रेड शरद् पाटलांचे एक अनुयायी कॉम्रेड Ganesh Nikumbh यांनी या वादासंदर्भात मेहंदळे यांच्या निधनानंतर एक हृद्य अशी आठवण सांगितली होती. ती त्यांच्याच शब्दांत,

“नवभारत’ मध्ये झालेल्या या वादानंतर कॉ . शरद पाटील यांचे पुण्यात व्याख्यान झाले . या व्याख्यानाला मेहेंदळे आवर्जून उपस्थिती राहिले आणि पहिल्या रांगेत बसून शपांचे व्याख्यान ऐकले . वैचारिक पातळीवर मतभेद असले तरी कटुता नव्हती . मेहंदळेंच्या मनाचा हा मोठेपणा शपा आपल्या व्याख्यानात सांगत . हे या निमित्ताने आवर्जून आठवले . मेहंदळेंना भावपूर्ण श्रद्धांजली !”

आदरणीय एम्. ए. मेहंदळे यांचे गेल्यावर्षी १०२ व्या वर्षी निधन झाले. पाटील-मेहंदळे यांच्यातील त्या ऐतिहासिक वादाविषयी कॉम्रेड शरद् पाटील काय म्हणतात हे पाहणे, ही आदरणीय एम्. ए. मेहंदळेना एक समयोचित आदरांजली ठरेल!

दि. २०.०८.२०२० : – सुभाषचंद्र सोनार.

गार्ग्य या ब्राह्मणी वैयाकरणाने निर्ऋतीच्या नावावरच व्युत्पादकीय हल्ला चढवला होता.

प्रश्न होता प्रातिपदिकाला उपसर्ग लागल्यानंतर होणा-या विकाराचा.

गार्ग्याचा युक्तिवाद होता, की उपसर्ग प्रातिपदिकाचा अर्थ विरूद्धातही बदलू शकतो.

‘ऋति’ चा अर्थ होता ‘सत्य’. ‘निस्’ हा नकारात्मक उपसर्ग लागल्यानंतर त्याचा अर्थ झाला ‘असत्य’. निर्ऋति अशा प्रकारे बनली असत्याची, दृष्टततेची, दुरिताची देवता.

त्याचे खंडन करीत शाकटायनने युक्तिवाद केला, की उपसर्गाला स्वत:चा अर्थ नसतो. तो केवळ प्रातिपादिकात दडलेला अर्थ बाहेर आणतो. म्हणून ‘ऋति’ चा अर्थ झाला ‘सत्याचे सत्य’; निर्ऋति स्रीसत्ताकतेच्या काळात सत्याची सर्वोच्च देवता होती.

मी शाकटायनच्या व्युत्पत्तीचे समर्थन केले, तर मेहंदळेंनी गार्ग्याचे. हे वाग्युद्ध १९८२-८३ या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वात प्रगल्भ मानल्या गेलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशींच्या ‘नवभारत’ मध्ये झाले. शाकटायनच्या समर्थनात मी यशस्वी झालो.

आपल्या प्रेमभक्तीचे सर्वोच्च निधान असलेल्या राणीची तिची प्रजा असलेली जनता बदनामी कशी करील?!

– कॉ. शरद् पाटील

(संदर्भ : ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता – स्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद’, पृ. क्र.२४)

0Shares

Related post

सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!

सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!

सम्राट अशोक, म. फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा…
महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न पुणे : भारतरत्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *