• 19
  • 1 minute read

अकोला जिल्ह्यात अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला जनसागराचा प्रतिसाद; प्रभाग १६ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुक  प्रचारात सर्वत्र धमाका असून वंचित बहुजन आघाडीच्या सभेचे नागरिकांमध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. आज अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६ (शिवणी खदान) मधील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
 
या सभेला शिवणी खदान परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे ‘वंचित’मय झाल्याचे पाहायला मिळाले.
 
विकासाचा ‘अकोला पॅटर्न’ राबवण्याचे आवाहन
 
सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या की, “अकोल्याच्या विकासासाठी आता बदलाची गरज आहे. अकोला शहर स्वच्छ आणि सुंदर बनवणे, सांडपाण्याची व्यवस्था (गटार), उत्तम रस्ते, आरोग्य सुविधा आणि महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अकोला शहरवासीयांनी आता एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी.”
 
प्रभाग १६ मधील ‘वंचित’चे अधिकृत उमेदवार:
 
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी प्रभाग १६ मधील खालील चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले:
 
१. उज्वलाताई प्रवीण पातोडे
२. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर
३. पराग रामकृष्ण गवई
४. शेख शमशु कमर शेख साबीर
 
या सभेमुळे प्रभाग १६ मध्ये वंचित बहुजन आघाडीची बाजू भक्कम झाल्याचे संकेत दिसून येत आहे. उमेदवारांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सभेला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *