असे असूनही उडियाला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
तमीळ साडेसातशे वर्षांची असूनही तमीळला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
मराठी दोन ते अडीच हजार वर्षांची असूनही मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
राजकीय पुढाऱ्यांची अनास्था हे कारण आहेच. महाराष्ट्र सरकार प्रभावी मांडणी व आग्रह करीत नाही.
ही राजकीय अनास्था तर आहेच तथापि “मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे”, अशी मांडणी करणारे व हा समज दृढ करणारे संस्कृतधार्जिणे दुढ्ढाचार्य यांची विचारसरणी ही यातली प्रमुख अडचण आहे.
मराठी ही महाराष्ट्री या अपभ्रंश भाषेपासून उदयाला आलेली आहे. इंग्रजी व फारशी भाषेतील शब्द ज्याप्रकारे मराठीत येऊन शब्दसंग्रह वाढला त्याचप्रमाणे संस्कृत तत्सम व संस्कृत तद्भव शब्द मराठीत येऊन शब्दसंग्रह वाढलेला आहे. किंबहुना अनेक देशी शब्द/ पाली,प्राकृत भाषेतील शब्द संस्कृतनेही स्वीकारले असून त्यावर संस्कार केलेले आहेत. असे शब्द मराठीने संस्कृतमधून घेतले आहेत,असा समजही दृढ करण्यात संस्कृताभिमानी विद्वान यशस्वी झालेले आहेत.