• 92
  • 1 minute read

चवदार तळ्याच्या पाण्याला लागलेल्या आगीतच मनुस्मृती जळून खाक…!

चवदार तळ्याच्या पाण्याला लागलेल्या आगीतच मनुस्मृती जळून खाक…!

देशाच्या साधन संपत्तीवर हजारो वर्षांपासून मनुवाद्यांची मुक्तेदारी राहिली होती. जगण्यावरच काय पिण्याच्या पाण्यावर सुद्धा या मनुवाद्यानी पाबंदी केली होती. त्याच पाण्याला आग लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमानवीय मनुवादी शक्तींशी रणसंग्राम सुरु करुन सामजिक न्याय्य व समतेचा पाया रचला. आजच्याच दिवशी हा रणसंग्राम झाला. पिण्याच्या पाण्यासाठी झालेल्या या चवदार तळे सत्याग्रहाची दखल साऱ्या जगाने घेतली व जगाचा वेशीवर ब्राह्मणी धर्मांच्या चिध्या टांगल्या गेल्या.
20 मार्च 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श करून ब्राह्मणी धर्माला आग लावली. हा महाड येथील सत्याग्रह पुढे अनेक महिने चालला. पाण्याला लागलेल्या या आगीने 25 डिसेंबर 1927 रोजी म्हणजे तब्बल 280 दिवसांनंतर व्यवस्थेला जाळून खाक केले. मनुस्मृतीचे दहन दिन म्हणुन या ही दिवसाची जगभराच्या इतिहासाने नोंद घेतली आहे.
जगण्याच्या सर्वच साधनांवर आपली मक्तेदारी लादून देशातील शूद्र, अतिशूद्र या बहुजन समाजाच्या जगण्याला नरक बनविण्याचे नीच अन् अमानवीय कृत्य ब्राह्मणी व्यवस्थेने केले होते. केवळ एका तळ्यातील पाण्याला स्पर्श करून व मनुस्मृतीची पाने जाळून मनुवादी व्यवस्था संपणारी नव्हती. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळी ही माहित होतेच. पण सामजिक न्याय व समतेच्या लढाईला सुरुवात करण्यासाठीं ते आवश्यक होते.
ब्राह्मणी व्यवस्थेने हजारो वर्ष शूद्र, अतिशूद्र या बहुजन समाजाला पाणी पिऊ दिले नाहीं. अन्न खाऊ दिले नाही. तरी हा समाज जगला. मेला नाही, असे सन १९१६ सालीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारच्या एका आयोगापुढे बोलताना सांगितले होतें. त्यावेळी ते केवळ २४ वर्षांचे होते. या आयोगाला त्यांनी त्याच वेळी ठणकावून सांगितले होते की आमची लढाई अन्न, पाण्यासाठी नाही. आमची लढाई, संघर्ष हा सामजिक न्याय, समतेसाठी आहे. अन् या देशातील राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठीचा आहे. सत्तेत हिस्सासाठीचा आहे. अन् भारतीय संविधान लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सामाजिक न्याय व समतेचा रणसंग्राम जो महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून सुरु केला होता तो जिंकला…..!
सामजिक न्याय व समतेच्या रणसंग्रामातील महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य सर्व नायकांना कोटी कोटी अभिवादन…! अन् या रणसंग्राम दिना निमित्त आपल्या सर्वांना मंगल कामना…!!
जयभीम, जय समाजवाद, लाल सलाम, जय संविधान !

– राहुल गायकवाड.
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *