काँग्रेस, भाजप - आरएसएस कडून बाबासाहेबांची नेहमी उपेक्षाच झाली
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचा दावा करत काँग्रेस आणि भाजप-आरएसएसवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्याकडे विशेष आग्रह केला होता.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर काही समर्पित आंबेडकरवादी आणि समाजवादी नसते, तर काँग्रेस आणि भाजप-आरएसएसने बाबासाहेबांना इतिहासातूनच नाही तर वर्तमान आणि भविष्यतूनही पूर्णपणे पुसून टाकले असते.
डिसेंबर १९८९ मध्ये व्ही.पी. सिंह यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या हस्तेच ३१ मार्च १९९० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. या सन्मानासाठी त्यांनी स्वतः व्ही.पी. सिंह यांच्याकडे आग्रह धरला होता, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.
या विधानाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप-आरएसएसवर आंबेडकरांविषयी असलेल्या ऐतिहासिक द्वेषाचा आणि उपेक्षेचा आरोप केला आहे.