आम्ही भारताचे लोकं, भारताचे मालक आहोत आणि, आपण निवडून दिलेले लोकं आपल्या अपेक्षेनुसार काम करण्यासाठी आपले प्रतिनिधी आहेत, आपले मालक नव्हेत. देशाची सत्ता कोणाच्या हातात असावी व देश कसा चालावा, हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार आपला अर्थात भारतीय नागरिकांचा आहे, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनींचा नाही. याचे भान प्रत्येक भारतीयाला असने गरजेचे आहे.
आपण निवडून दिलेले राजकीय पक्ष/लोकंप्रतिनिधी जेव्हा संविधानीक अनैतिकतेकडे वळतात, तेव्हा आपण मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून अशा अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने आपले कर्तव्य व जवाबदारी आहे.
२०२४ ची लोकसभा निवडनुक आली आहे. सुज्ञ व जवाबदार मतदार म्हणून आपण आपले कर्तव्य व जवाबदारी प्रामानिक पणे पार पाडून, आपले मालक होऊन देशात अराजकता माजवू पाहणाऱ्या भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना घरी बसवूया.