विमुक्त जाती व भटक्या जमाती संदर्भातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 ला एक शासन निर्णय जारी केला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या जी आर च्या अंमलबजावणी साठी राज्य, जिल्हा व उपविभाग स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. शासनाचे चांगला निर्णय घेतला आहे. शासनाचे अभिनंदन. या जीआर ची प्रभावी अंमलबजावणी झाली तर अनेकाना लाभ मिळेल.
विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांनी या जीआर चे वाचन करून समाजाला जागृत करावे आणि प्रशासनाने त्यांचे वस्तीत किंवा भागात विशेष शिबिरांचे आयोजन करून लाभ देण्यास सांगावे. हा जीआर , इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांचेकडे, उपसंचालक यांचेकडे उपलब्ध आहे. तहसीलदार, एस डी ओ, जिल्हाधिकारी,बी डी ओ, सी इ ओ, यांचेकडे सुद्धा उपलब्ध आहे.
इ झेड खोब्रागडे भाप्रसे नि संविधान फाऊंडेशन नागपूर