• 305
  • 1 minute read

संघर्षाची यशस्वी गाथा

संघर्षाची यशस्वी गाथा

फोटोत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांच्याबरोबर दिसते ती मुलगी आहे प्रज्ञा. तिचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रचूड यांनी आज १३ मार्च, २०२४ रोजी मुद्दाम सुप्रीम कोर्टातील लंच लौंजमध्ये तिला तिच्या आई वडिलांसह जेवणास बोलावले होते. सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश या जेवणास आणि प्रज्ञाचे अभिनंदन करण्यास हजर होते. असा सन्मान मिळणारी ही प्रज्ञा आहे तरी कोण?
सुप्रीम कोर्टातील एका अन्य न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या एकाची प्रज्ञा ही मुलगी. हुशार आणि आजूबाजूला कायद्याचे वातावरण. त्यामुळे विधी पदवीधर झाली. मग सुप्रीम कोर्टाच्या रीसर्च आणि प्लॅनिंग सेंटरमध्ये विधी संशोधक म्हणून संधी मिळाली. त्या अनुभवावर आणि हुषारीवर ती विधी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील सहा विद्यापीठात पात्र ठरली आहे. कोलंबिया, पेनिंसिल्व्हनिया, शिकागो, न्यूयॉर्क, बरकले आणि मिशिगन ही ती विद्यापीठे. मिशिगन विद्यापीठाने तिला वार्षिक ५० हजार डॉलरची शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केली आहे. यापैकी एक विद्यापीठ निवडून ती लवकरच अमेरिकेस जाईल. अश्या गुणी मुलीचे अभिनंदन !

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *