• 21
  • 1 minute read

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

भाजपसाठी योग्य नारा : 400 पार नाहीतर 40 च्या आत

या देशाची लोकशाही व संविधानाला आम्ही असताना कुणी ही हात लावू शकणार नाही. बदलण्याची गोष्ट तर खूप दूरची आहे, असा विश्वास, ग्वाही काल बिहारमधील ऐतिहासिक गांधी मैदानात झालेल्या ऐतिहासिक जन विश्वास सभेत अखिलेश यादव अन् तेजस्वी यादव यांनी दिली. पलटूराम नितीशकुमारची पलटी अन् भाजप सोबत जाणे इंडिया आघाडीच्या पथ्यावरच पडल्याचे या सभेने दाखवून दिलं. नीतिशकुमार इंडिया आघाडीतील बोझ होते, हे ही सिद्ध झाले. या सभेने अनेक गोष्टी एकाच वेळीं सिद्ध केल्या. इंडिया आघाडी मोदी समोरचा पर्याय आहे की नाहीं, हा प्रश्नच निकाली काढत केवळ इंडिया आघाडीच या देशाचे नेतृत्व करू शकते. देशाला इंडिया आघाडी शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही, ही फार मोठी गोष्ट या सभेने सिद्ध केली. अन् तसा विश्वास देशभरातील जनतेला दिला.
मोदींसमोर पर्याय नाही तर पर्याय या संकल्पनेपासून मोदींलाच बाद करण्यात तेजस्वी यादव यांना यश मिळाले. मोदी विरोधात विरोधकांची आघाडी टिकेल की नाही, असे वातावरण देशात असताना उत्तर प्रदेशातील जागा वाटपाचा तिढा यशस्वीपणे सोडवून अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीला ऊर्जा मिळवून दिली होती. तर बिहारमध्ये जन विश्वास यात्रा काढून तेजस्वी यादव यांनी जनतेचा जो विश्वास संपादन केला. या दोन घटनांनी मोदी समोरील पर्याय सोडा सत्तेच्या राजकारणातून मोदीच काय भाजपला ही बाद केलें. देशाच्या भवितव्यासाठी या दोन्ही घटना फार ऐतिहासिक परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत.
देशातील सत्ता निरंकुशपणे वागायला लागते. संसद जेव्हा आवारा बनते. तेव्हा देशातील जनता मस्तवाल सत्तेची मस्ती उतरविते. हे देशात जेपी व व्हीपी आंदोलनाने दाखवून दिलं आहे. अन् या दोन्ही वेळीं पाटण्यातील हे गांधी मैदानं साक्षीदार आहे.
या सभेने देशातील जनतेला विश्वास तर दिलाच. पण मोदीला सत्ते वरून उखडून टाकण्याचा फॉर्म्युला दिला. अखिलेश यादव यांनी लोकसभेच्या 120 जागांचा फॉर्म्युला सांगितला अन् मोदींच्या 400 पार या नाऱ्याची हवाच काढली. बिहारमधील 40 व उत्तर प्रदेशातील 80 या जागांवर भाजपची कोंडी करण्याचा हा फॉर्म्युला आहे. महाराष्ट्रातील 48 व कर्नाटकातील 28जागांवर अशीच कोंडी करता आली तर हा आकडा 206 जागापर्यंत जावू शकतो. अन् अगदीं सहजपणे ही कोंडी करता येवू शकते.
. दक्षिण भारतात लोकसभेचा 132 जागा असून या ठिकाणीं भाजपची स्थिती फार बिकट आहे. त्याशिवाय भाजपला कुणीच मित्र नाही. येथील कर्नाटक व तेलंगना ही दोन राज्य काँग्रेसकडे आहेत. केरळ अन् आंध्र प्रदेशात मोदींच्या विरोधातील सरकारं असून कुठल्या ही परिस्थितीत तेथून जागा वाढवायला भाजपला संधी नाही. त्यामुळे कर्नाटकच्या 28 जागा वगळल्या तर 104 जागा आहेत. या 300जागांवर भाजप बॅकफूटवर आहे.
मणिपूरच्या घटनेनंतर पूर्व भारतात भाजपसाठी अनुकूल स्थिती राहिलेली नाही. येथे 153जागा आहेत. येथे ही भाजपची कोंडी होऊ शकते. झारखंडमधील 14 व पंजाबमधील 13 जागांवर कोंडी करता येवू शकते. मोदीने देशात जी धोरणे राबविली आहेत. त्यामुळें सत्तेच्या विरोधात फार मोठा रोष असल्याने राज्यस्थान व मध्य प्रदेश ही भाजपसाठी सोपे नाहीं. गांधी मैदानातून सुरु झालेली मोदी लाट देशभर पसरली तर गुजरात ही भाजप सोबत उभे राहणार नाही, हे खरे. अन् असे झाले तर 400पार नाही तर 40 च्या आत. हा नारा भाजपसाठी योग्य ठरेल.

– राहुल गायकवाड.

0Shares

Related post

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत…

सध्या भारतीय वेब विश्वात धमाकेदार प्रयोग होतांना दिसताहेत. एका बाजुला हिंदी इंडस्ट्रीतल्या मात्तब्बर निर्मात्यांच्या बिग बजेट…
स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *