अजित तायडे यांची मंत्रालयात अवर सचिव पदावर पदोन्नती
मुंबई : मंत्रालयात विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या प्रशासकीय कामाचा ठसा उमटविणारे अधिकारी म्हणून नावलौकिक असणारे अजित तायडे यांची अवर सचिव पदावर पदोन्नती झाली आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात त्यांची नियुक्ती झाली असून या विभागातही ते आपला कामाचा ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अजित तायडे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बॅंकेच्या संचालक मंडळावर ही निवडून आले आहेत. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.