• 76
  • 1 minute read

अमेरिकेच्या दबावासमोर इराण झुकला नाही; भारताने पाकिस्तानला हरवण्याची संधी गमावली ― ॲड. प्रकाश आंबेडकर

अमेरिकेच्या दबावासमोर इराण झुकला नाही; भारताने पाकिस्तानला हरवण्याची संधी गमावली ― ॲड. प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली : जगात इराण इस्रायल युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता स्वतःची भूमिका ठामपणे मांडली आहे. “आम्ही कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका इराण सरकारने मांडली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निर्णयक्षमता आणि स्वाभिमान अधोरेखित झाला आहे.
 
दुर्दैवाने, भारताने पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावा दरम्यान बोटचेपी भूमिका घेतली. यात भारताने ऐतिहासिक संधी गमावली. भारताच्या हाती पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची संधी होती. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्तक्षेपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली झुकून ती संधी वाया घालवली.
 
आज त्याच ट्रंप यांनी पाकिस्तानला आपला “सर्वात चांगला मित्र” घोषित केले असून, पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अमेरिकेत खास दावत देण्यात आली आहे. अमेरिका-पाकिस्तान संबंध नव्याने मजबूत होताना दिसत आहेत, जे भारताच्या रणनीतिक दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
 
या पार्श्वभूमीवर अनेक विश्लेषक आणि राजकीय जाणकार पंतप्रधान मोदींच्या त्या काळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
 
0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *